ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर: हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील- मुख्य सचिव - cross-border terrorism

कयदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, परिस्थिती सुधारताच सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील, असे जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रहमण्यम यांनी म्हटले आहे.

बीवीआर सुब्रमण्यम
author img

By

Published : Aug 16, 2019, 4:38 PM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्यानंतर खोऱ्यातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिबंधात्मक उपाय राबवले आहेत. या काळात सीमापार दहशतवाद्यांकडून असणारा धोका नाकारता येत नाही. तसेच दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये काही घातपात करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खोऱ्यात काही निर्बंध लावण्यात आल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले. मात्र, परिस्थिती सुधारताच सर्व निर्बंध शिथील करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

परिस्थिती पूर्वपदावर आणणे हे सराकरचे मुख्य ध्येय आहे. मात्र, दहशतवाद्यांना कोणतीही संधी मिळू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांची मुक्त संचार बंदी , मोबाईल-इंटेरनेट सुविधा आणि खोऱ्यातील शाळा-कॉलेज बंद आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काही लोकांना नजरकैदेत ठेवले असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

सरकारी कार्यालये आणि श्रीनगर येथील सचिवालयाचे कामकाज आजपासून सुरू करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालये पुढच्या आठवड्यांपासून सुरू करण्यात येणार आहेत. इंटरनेट सुविधा आणि लोकांवरील बंधने हळूहळू शिथिल करण्यात येतील. तसेच वाहतूक व्यवस्थाही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली.

22 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात स्थिती पूर्वपदावर येत आहे. तसेच या काळात एकही जीव गेला नसल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.