ETV Bharat / bharat

जैश -ए- मोहम्मदचा वायू सेनेच्या तळांवर हल्ल्याचा कट, हाय अलर्ट जारी - हाय अलर्ट भारत

गुप्तचर यंत्रणेच्या हाती आलेल्या माहितीनुसार जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटना भारतातील एअर फोर्सच्या तळांवर हल्ल्याचा कट आखत असल्याचे समोर आले आहे.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:45 AM IST

नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच गुप्तचर यंत्रणेच्या हाती आलेल्या माहितीनुसार जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटना भारतातील एअर फोर्सच्या तळांवर हल्ल्याचा कट आखत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लष्करी तळांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे.

  • Top Govt Sources: IAF bases in Srinagar, Awantipora, Jammu, Pathankot, Hindon have been put on high alert at orange level. Senior officers are reviewing security arrangements 24x7 to tackle the threat. The alert has emanated after agencies monitored movements of Jaish terrorists. https://t.co/kRdDAQPzXV

    — ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

८ ते १० दहशतवाद्यांचा गट वायू सेनेच्या तळांवर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. काश्मीर परिसरातील वायू सेनेच्या तळांवर आत्मघाती हल्लेखोरांकरवी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, अवंतीपोरा, पठाणकोट, हिंदोन, जम्मू येथील वायू सेनेच्या तळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. तसेच सुरक्षा दले डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत आहेत. गुप्तचर यंत्रणेला जैश- ए- मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांची हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर हाय अलर्ट देण्यात आला आहे.

बालाकोट येथील जैश ए मोहम्मद संघटनेचा तळ उद्धस्थ केल्यानंतर दहशतवादी चवताळलेले आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडूनही दहशतवाद्यांना मदत करण्यात येत आहे. भारतील महत्त्वाच्या शहरांना आणि किनारी भागांना आधीच हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.