ETV Bharat / bharat

अखेर चंद्राबाबू नायडूंच्या 'प्रजा वेदिका'वर हातोडा, मुख्यमंत्री जगनमोहन यांनी दिले होते आदेश - 'Praja Vedika

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.

'प्रजा वेदिका'
author img

By

Published : Jun 26, 2019, 4:08 PM IST

Updated : Jun 26, 2019, 4:20 PM IST

अमरावती - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.

'प्रजा वेदिका'

'प्रजा वेदिका हा अवैधरित्या बांधलेला बंगला आहे. कृष्णा नदीकाठी त्याचे विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. तेलुगु देसम पक्षाच्या मागील कार्यकाळात माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानासमोर प्रजा वेदिकाचे निर्माण करण्यात आले होते', आशी माहिती रेड्डी यांनी दिली आहे.

दरम्यान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चंद्राबाबू नायडू प्रजा वेदिका बंगल्यावर पोहोचले. येथे शेकडो टीडीपी कार्यकर्तेही जमा झाले होते.

प्रजा वेदिका टीडीपीच्या अधिकृत बैठकी आणि पक्षाच्या बैठकीसाठी वापरण्यात येत होता. टीडीपीच्या पराभवानंतर चंद्राबाबू नायडू यांनी ५ जून रोजी पत्र लिहित प्रजा वेदिका विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान म्हणून देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.