वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार आणि मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मोदींनी आपल्या ट्विटरवरुन एक योग निद्रा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर इव्हांकाने हे अप्रतिम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच या व्हिडिओसाठी मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी ट्विट करत योग निद्राचे फायदे सांगितले होते. यासोबतच त्यांनी सांगितले, की ते आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा याचा सराव करतात. यामुळे, मन शांत होते तसेच तणाव कमी होण्यास मदत होते.
जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी योग निद्राचा सराव करतो. यामुळे सर्वांगीण कल्याण होते, मनाला शांती मिळते, तणाव आणि चिंता कमी होते. योग निद्राचे बरेच व्हिडिओ नेटवर आपल्याला मिळतील. मी एक व्हिडिओ हिंदी आणि इंग्रजीमध्ये शेअर करत असल्याचे त्यांनी यात मह्टले होते. यावर प्रतिक्रिया देत इव्हांकाने हे अप्रतिम असल्याचे म्हटले.
-
This is wonderful! Thank you @narendramodi!#TogetherApart https://t.co/k52G4viwDs
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is wonderful! Thank you @narendramodi!#TogetherApart https://t.co/k52G4viwDs
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 31, 2020This is wonderful! Thank you @narendramodi!#TogetherApart https://t.co/k52G4viwDs
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 31, 2020
रविवारी झालेल्या मन क बात या आपल्या कार्यक्रमात मोदी म्हटले होते, की ते योगा करतात आणि या आसनांचा त्यांना फायदाही होतो. यासोबतच याचे काही व्हिडिओ मी सोशल मीडियावर शेअर करतो, कदाचित याचा लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना फायदा होईल.