ETV Bharat / bharat

भारत- चीन सीमेवर जलद हालचालींसाठी जवानांना मिळणार अत्याधुनिक वाहनं!

author img

By

Published : Jun 23, 2020, 7:50 PM IST

आणीबाणीच्या काळात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाण जलद जाणे सैनिकांना गरजेचे असते, असे संसदीय समितीच्या लक्षात आल्यानंतर अत्याधुनिक वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - चीनबरोबरच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि सरकारही अधिक सतर्क झाले आहे. भारत आणि चीनमध्ये डोंगराळ, पहाडी आणि खडकाळ भागात 3 हजार किमीपेक्षा जास्त लांबीची सीमारेषा आहे. या खडतर प्रदेशात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांना सीमेवर जवानांची आणि सामानाची जलद वाहतूक करण्यासाठी उच्च ताकदीची (हाय पॉवर) वाहने देण्यात येणार आहेत.

अंतर्गत सुरक्षेसंबधी संसदेच्या स्थायी समितीमध्ये सीमा भागातील जलद हालचाल गरजेची असते असा विषय चर्चला आला होता. आणीबाणीच्या काळात तर जास्तच गरजेचे असते, असे समितीच्या लक्षात आल्यानंतर अत्याधुनिक वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जवानांना विना अडथळा आणि जलद एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाता आले पाहिजे. त्यासाठी दिरंगाई न करता विशेष वाहने जवानांना देण्यात यावीत, असे समितीने सुचविले आहे, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मार्च महिन्यात या सुचना केल्या होत्या त्यानुसार आता या गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आयटीबीपीकडे सध्या उच्च क्षमतेच्या एसयुव्ही आणि अॅम्फिबियंन्स वाहने असून आणखी जास्त क्षमतेची वाहने ताफ्यात आणण्याचे नियोजन सुरु असल्याचे आयटीबीपीने सांगितले. गृहमंत्रालयाने 18 उच्च क्षमतेच्या वाहनांना परवानगीही दिली आहे.

यासोबतच सीमेवर तैनात असताना तत्रंज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा असेही समितीने सुचविले आहे. 3 हजार 488 किमी भारत चीन सीमारेषा लष्कर आणि आयटीबीपी द्वारे सुरक्षित ठेवली जाते. सीमेवरील 32 महत्त्वाच्या रस्त्यांचे कामही जलद पूर्ण करण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे. यासोबतच सीमेवर वीज, आरोग्य सुविधा, संपर्कव्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.