कोलकाता (प. बंगाल) - राजधानी दिल्लीत सुरू असलेला हिंसाचार, रक्तपात आणि सरकारच्या भूमिकेबाबत व्यक्त होताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक कविता लिहिली आहे. या कवितेचे शिर्षक 'नरक' असे असून ही कविता इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषेत आहे. ही कविता त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून अंतिमतः त्यांनी, हा लोकशाहीचा अंत आहे का ? असा सवाल केला आहे.
हेही वाचा... दिल्ली हिंसा : पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी , 106 जणांना अटक तर 18 जणांवर एफआयआर दाखल
दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करत ममता यांनी या कवितेच्या माध्यमातून तोडफोड व जाळपोळीच्या होणाऱ्या घटनांची उत्तरे मागितली आहे...
दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 27 लोक मरण पावले आहेत. तसेच या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी आहेत. तर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी 18 गुन्ह्यांची नोंद केली असून 106 लोकांना अटक केली.
हेही वाचा... 'शांतता आणि एकोपा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा'; सर्वांनी शांतता बाळगावी'