ETV Bharat / bharat

मराठी पाऊल पडते पुढे...! महेश भागवतांची तेलंगाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती - Mahesh Bhagwat

भारतीय पोलीस सेवेत १९९५ मध्ये दाखल झालेले मराठमोळे अधिकारी महेश मुरलीधर भागवत हे सध्या तेलंगणा राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप तेलंगणा राज्यात यशस्वीपणे पाडल्यामुळे त्यांची तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS officer Mahesh Bhagwat
आयपीएस अधिकारी महेश भागवत
author img

By

Published : Jun 19, 2020, 3:26 PM IST

हैदराबाद - प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याचा मराठी माणसांचा इतिहास आहे. त्यामुळेच आपले राज्य 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये आता आणखी एका मराठी अधिकाऱ्याचे नाव घ्यावे लागेल. मराठी पाऊल पडते पुढे याप्रमाणे मुळ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील असलेले महेश भागवत यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा मोठा ठसा तेलंगाणा राज्यात उमटवला आहे. त्यामळे त्यांची प्रथम तेलंगाणातील रचकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून आणि आता तेलंगाणा राज्याचे 'अतिरिक्त पोलीस महासंचालक'पदी वर्णी लागली आहे.

IPS officer Mahesh Bhagwat appointed as Telangana state Additional Director General of Police
रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून महेश भागवत यांचे कार्य उत्कृष्ठ ठरले आहे...

१९९५ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेले महेश मुरलीधर भागवत हे सध्या तेलंगाणात कार्यरत आहेत. ते मूळ अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डीचे आहेत. मानवी तस्करीविरोधात त्यांनी गेली १३ वर्षे काम केले असून त्याच जोडीला त्यांनी नक्षलवादाच्या प्रश्नातही चांगली कामगिरी केली आहे. अक्षरश: शेकडो लोकांना त्यांनी मानवी तस्करीच्या शापातून बाहेर काढले आहे. त्यात त्यांनी नागरी समुदाय संघटना व इतर सरकारी विभागांची मदतही घेतली. साधारणपणे प्रत्येक मोठय़ा शहरात मानवी तस्करीचे प्रकार चालतात. महिला व मुलींना विकून त्यांना वेश्या व्यवसायास लावले जाते. पण ही प्रकरणे सरधोपटपणे हाताळली जातात. भागवत यांनी ती अभिनव पद्धतीने हाताळत त्यांच्या मुळाशी जाऊन अनेक टोळ्यांची कारस्थाने उघड केली.

लॉकडाऊनच्या काळात देखील महेश भागवत यांनी अनेक गरजूंना अन्न वाटप केले. तसेच कित्येक स्थलांतरित नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासोबतच पोलीस दलाची उत्कृष्ट कार्याची दखल घेत तेलंगणा सरकारने त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे.

तेलंगणात महेश भागवत एक लोकप्रिय अधिकारी आहेत...

हेही वाचा... भारत-चीन सीमावादामुळे राम मंदिराचे भूमीपूजन लांबणीवर...

महेश भागवत यांच्या कार्याची पाऊलवाट...

महेश भागवत १९९५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. मुळ पाथर्डीचे असलेल्या भागवत यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरींग केले. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील अनेक अधिकार्‍यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत.

मानवी तस्करी रोखण्यात अभिनव पद्धतीने प्रयत्न करणारे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने २०१७ चा टीआयपी रिपोर्ट हिरो पुरस्कार देऊन गौरवले आहे. २७ जूनला मानवी तस्करीबाबतचा हा अहवाल जाहीर करण्यात आला, त्यात वास्तवातील ज्या नायकांचा गौरव करण्यात आला, त्यात भागवत यांच्या नावाचा समावेश होता.

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असेच कार्य महेश भागवत यांचे आहे. तेलंगाणा राज्यात 'अन्नदाता' अशी त्यांची ओळख आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.