ETV Bharat / bharat

आयएनएक्स प्रकरणी सीबीआयचा देशाबाहेरही तपास..

सीबीआयने २०१७ मध्ये आयएनएक्स मीडिया कंपनीच्या परदेशी गुंतवणुकीतील अनियमितता पाहून, त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. २००७ साली, यात ३०५ करोड रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंजूरी दिली होती.

author img

By

Published : Aug 23, 2019, 11:39 PM IST

आयएनएक्स प्रकरण

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया केस संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी, सीबीआयने पाच देशांशी संपर्क साधला आहे. कंपनीशी झालेल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी सीबीआयने हे पाऊल उचलले आहे. या पाच देशांमध्ये युनायटेड किंगडम, मॉरिशस, बर्म्युडा, स्वीत्झलँड आणि सिंगापूरचा समावेश आहे.

सीबीआयने २०१७ मध्ये आयएनएक्स मीडिया कंपनीच्या परदेशी गुंतवणुकीतील अनियमितता पाहून, त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. २००७ साली, यात ३०५ करोड रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंजूरी दिली होती.

चिदंबरम यांची सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, एका विशेष न्यायालयाने गुरुवारी पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या अटकेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत, चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

Intro:Body:

मुंबई - अभिनेता विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच विकीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर आता विकी एका अल्बम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

बडा पछताओगे असं शीर्षक असलेल्या या गाण्यात विकीसोबत नोरा फतेहीदेखील आहे. अरिजीत सिंगनं आवाज दिलेलं हे एक भावनिक गाणं आहे. जोडीदार म्हणजेच विकीपासून लपून एका दुसऱ्या मुलाला डेट करणाऱ्या नोराची आणि या सर्वात विकीची होणारी घालमेल गाण्यात पाहायला मिळते. 

अनेकदा डान्समधूनच प्रेक्षकांसमोर येणारी नोरा आणि आतापर्यंत कधीही न पाहिलेला विकीचा वेगळा लूक यात पाहायला मिळत आहे. विकीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत हे आपलं पहिलं अल्बम साँग असल्याचं म्हटलं आहे. आता विकीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.