ETV Bharat / bharat

जागतिक युवा दिन: उर्जेचा अखंड प्रवाह....युवकांच्या हातात जगाचं भविष्य - International Youth Day 2020

या वर्षीच्या जागतिक युवा दिनाचा विषय 'युथ एन्गेजमेंट फॉर ग्लोबल अ‌ॅक्शन' म्हणजेच जागतिक कृतीसाठी तरुणांचा सहभाग असा आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर युवा विविध संघटना आणि संस्थांमध्ये कसे योगदान देत आहेत, त्याला अधोरेखित करुन युवकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

international  youth day
आंतरराष्ट्रीय युवा दिन
author img

By

Published : Aug 12, 2020, 7:09 AM IST

हैदराबाद - आज (बुधवार, १२ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय 'युथ डे' म्हणजेच युवा दिवस आहे. जगभरात भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. ३५ वर्षापर्यंतचे ६५ कोटी युवा आपल्या देशात आहे. तरुणांच्या उर्जेने आपला देश ओसंडून वाहत आहे. या उर्जेचा योग्य वापर केला तर भारत नक्कीच महासत्ता बनेल. मात्र, त्यासाठी देशातील तरुणांना योग्य मार्गदर्शन, कौशल्य आणि शिक्षण देण्याची गरज आहे.

युवा शक्तीच्या जोरावर भारताला अशक्य अशी उद्दिष्ट्यै साध्य करता येतील. जगभरातील अनेक देशांत तरुणांची संख्या कमी होत आहे. तसेच लोकसंख्याही रोडावत आहे. मात्र, भारत एकमेव देश आहे, जेथे सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. इतर देशांमधून उठून दिसण्यासाठी आणि प्रगतीपथावर पुढे जात राहण्यासाठी भारतातील युवक कठोर परिश्रम करणारा आणि गुणवान असणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांना आणखी सक्षम करण्यासाठी काय करता येईल याचा उहापोह जागतिक युवा दिनी व्हायला हवा. भारतातील युवकांना योग्य दिशा दिल्यास नक्कीच भारताचा विकास वेगाने होईल.

जागतिक युवा दिनाचा इतिहास

१२ ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक युवा दिन' साजरा केला जाईल, असा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १७ डिसेंबर १९९९ ला घेतला. १२ ऑगस्ट २००० साली पहिल्यांदा युवा दिन साजरा करण्यात आला. तर याआधी १९८५ हे वर्ष जागतिक युवा वर्ष म्हणूनही घोषित करण्यात आले होते.

जगभरात युवा दिन कसा साजरा केला जातो

दरवर्षी संयुक्त राष्ट्राकडून युवा दिनाचा विषय ठरवला जातो. या दिवशी युवकांशी संबंधीत विविध प्रकारचे कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर आयोजित केले जातात. परेड, कॉन्सर्ट, मेळावे, प्रदर्शन, तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम, व्याखाने, चर्चा परिसंवाद आयोजित केले जातात. या कार्यक्रमांतून तरुणांना संदेश दिला जातो. टीव्ही, रिडिओ या द्वारेही अनेक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते.

2020 युवा दिनाचा संदेश

या वर्षीच्या जागतिक युवा दिनाचा विषय 'युथ एन्गेजमेंट फॉर ग्लोबल अ‌ॅक्शन' म्हणजेच जागतिक कृतीसाठी तरुणांचा सहभाग असा आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर युवा विविध संघटना आणि संस्थांमध्ये कसे योगदान देत आहेत, त्याला अधोरेखित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच तरुणांचा राजकारणात सहभाग कसा वाढेल यावर चर्चा करण्यात येत आहे. जागतिक उद्दिष्ट्यै साध्य करण्यासाठी तरुणांचा सहभाग जास्त सर्वसमावेशकतेने करण्यासाठी काय करता येईल यावर्षी चर्चा होत आहे. मात्र, कोरोनामुळे यावर्षी कार्यक्रम घेण्यावर बंधणे आले आहेत.

तरुणांचा सहभाग येथे वाढविण्याचा प्रयत्न

  • स्थानिक आणि समुदाय स्तरावर तरुणांचा सहभाग वाढविणे
  • राष्ट्रीय स्तरावर कायदे, धोरणे आखताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना तरुणांचा सहभाग
  • जागतिक स्तरावर तरुणांचा सहभाग कसा वाढवता येईल

सोशल मीडिया अभियान

#31DaysOfYOUth या अभियानाद्वारे युवा दिन संपूर्ण ऑगस्ट महिना साजरा करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे करण्यात येत आहे.

कोरोनाचा भारतीय युवांवर झालेला परिणाम

देशभरात कोरोना लॉकडाऊनमध्ये सूट दिली असली तरी तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होतच आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी' या संस्थेनुसार १७ मे ला देशात २४ टक्के बरोजगारीचा दर होता. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असताना आणि मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल केला असतानाही बेरोजगारीच्या दरावर कोणताही परिणाम झाला नाही. संस्थेनुसार, मार्च २१ ला देशात ७.४ टक्के बरोजगारी दर होता. तो ५ मे ला वाढून २५.५ टक्के झाला. २० ते ३० वयोगटातील २ कोटी ७० लाख तरुणांची एप्रिल महिन्यात नोकरी गेली. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील बेरोजगारी ३०.९ टक्के या दराने वाढेल, असा अंदाज संस्थेने वर्तवला आहे.

युवकांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना

प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना

केंद्र सरकारने २०१५ साली कौशल्य विकास योजना युवकांसाठी सुरु केली. २०२० पर्यंत १ कोटी युवकांना कौशल्याधारीत बनवणे आणि कार्यक्षम करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७३ लाख ४७ हजार युवकांनी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे. त्यातील १६ लाखांपेक्षा जास्त युवकांना रोजगारही मिळाला आहे. १३७ विविध क्षेत्रातील कौशल्य तरुणांना देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

तरुणांनी व्यावसायिक बनावे, स्वत:चा व्यवसाय सुरु करावा यासाठी त्यांना कमी दराने कर्ज उपलब्ध व्हावे, म्हणून, ही योजना सुरु करण्यात आली आहे. शिशु, किशोर आणि तरुण या तीन योजनांतर्गत तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्यात येत आहे. ५० हजार ते १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा आत्तापर्यंत ११ लाख नवउद्योजकांनी फायदा घेतला आहे.

स्किल इंडिया मिशन

या मिशन अंतर्गत ६९ लाखांपेक्षा जास्त युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरुणांना कौशल्य मिळावे, त्याआधारित काम किवां स्वत:चा उद्योग करण्यास सक्षम बनविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत देशभरात स्किल सेंटर उभारण्यात आले आहेत. २०२० च्या शेवटीपर्यंत १ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

मेक इन इंडिया

देशांतर्गत उत्पादन आणि निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत देशात गुंतवणूक वाढवणे, नव्या अविष्कारांना चालना तसेच उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यास चालना देण्यात येत आहे. बौद्धीक संपदेचे रक्षण करण्याचेही उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सरकारने २५ क्षेत्रांची निवड केली आहे. संरक्षण उत्पादने निर्मिती, बांधकाम, रेल्वे या क्षेत्रांमध्ये थेट गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान

मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. मुलींच्या कल्याणासाठीच्या योजना त्यांची त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे. १०० कोटी निधीसह या योजनेचे सुरुवात करण्यात आली होती. २०१४-१५ ते २०१८-१९ या काळात बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानासाठी केंद्र सरकारने ६४८ कोटी रुपयांची तरदुत केली होती. या काळात मुलींचा जन्मदर ९२६ वर ९३१ वर गेल्याचे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

या सोबतच डिजिटल क्षेत्रांचा विकास करण्यासाठी डिजिटल इंडिया मिशन सुरु करण्यात आले आहे. तर तरुणांनी नाविन्यपूर्ण उद्योग सुरु करावे, म्हणून स्टार्टअप इंडिया मोहिम सुरु केली. देशामधील तरुण तसेच सर्व जनता शारिरीक दृष्या सक्षम बनावी म्हणून फिट इंडिया अभियानही सुरु करण्यात आले आहे. या सर्व अभियांनांचा उद्देश्य तरुणांना सक्षम बनविणे असा आहे. देशातील युवक सक्षम झाला तर देशाची प्रगती वेगाने होईल यात कोणतीही शंका नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.