ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल - नौसेना

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे धाव घेतली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज निकाल देणार आहे. आज दुपारी तीन वाजता नेदरलँडच्या हेग येथील न्यायालयात हा निकाल देण्यात येईल.

कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 17, 2019, 3:33 AM IST

Updated : Jul 17, 2019, 8:04 AM IST

हेग - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज निकाल देणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात राहणार की नाही हे स्पष्ट होईल.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च २०१६ मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तसेच, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.

पाकिस्तानी लष्कराने कुलभूषण यांना बलुचिस्तान प्रांतात पकडल्याचा दावा केला होता. तसेच, कुलभूषण इराणमार्गे पाकिस्तानात घुसल्याचा बनाव रचला होता. भक्कम पुरावे असल्याची बतावणी करत पाकिस्तानी मिलिटरी न्यायालयाने कुलभूषण यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकतर्फी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. यामुळेच कुलभूषण यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली होती. तसेच, पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते.

जाधव यांना पाकिस्तानने ३ वर्षांपासून विनाकारण डांबून ठेवले आहे. तसेच, भारताच्या परराष्ट्र वकीलातीने जाधव यांच्याशी संपर्क करू देण्यासाठी पाकिस्तानला १३ वेळा विनंती केली होती. मात्र, पाकिस्तानने याकडे कानाडोळा करून व्हिएतनाम कराराचे उल्लंघन केले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 8:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.