अहमदाबाद- आयएनएस विराट ही विमानवाहू जहाजाने 30 वर्षे नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. तीन वर्षापूर्वी आयएनएस नौदलामधून बाहेर काढण्यात आली. ही आयएनएस विराट टोईंगने मुंबईहून गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील मलंग येथे नेण्यात येणार आहे. तिथे आयएनएसचे तुकडे करून भंगारात विकण्यात येणार असल्याचे सरकारीअधिकाऱ्याने सांगितले.
सर्वात जुनी युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. आयएनएस विराटचा नौदलात 1987 मध्ये समावेश करण्यात आला. श्रीराम ग्रुपने मेटल स्क्रॅप ट्रेडच्या लिलावातून आयएनएस विराट ही 38.54 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
गुजरातमधील अलंगमध्ये श्रीराम ग्रुप हा जहाज तोडणीचा प्रकल्प आहे. या कंपनीचे चेअरमन मुकेश पटेल म्हणाले, की मुंबईवरून अलंगला नेण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. जहाजाच्या पुनर्प्रक्रियेचे पहिले पर्यावरणस्नेही यार्ड अलंगमध्ये आहे. या ठिकाणी आयएनएस विराटवर 9 ते 12 महिन्यांत पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे.
आयएनएस विराट ही भंगारात काडण्याचा निर्णय भारतीय नौदलाशी चर्चा करून घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते. आयएनएस विराट ही भारतीय नौदलाने 65 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. यापूर्वी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतदेखील 2014 मध्ये भंगारात काढण्यात आली आहे. या युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतरण करावे, अशी नागरिकांनी मागणी केली होती.