चूरू (राजस्थान) - राजस्थानमध्ये दररोज महिला अत्याचाराच्या घटना आहे. आज चूरू येथे अज्ञात व्यक्तीने 40 वर्षीय महिलेचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
५ ऑक्टोबर रोजी रात्री एक महिला घरातून अचानक गायब झाली, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी पोहोचली. ती जेव्हा घरी पोहोचली तेंव्हा तिचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर चावा घेतल्याचे खुना होत्या. तसेच चेहऱ्यावरून रक्तस्त्राव सुरू होता. तिला कसलेच भान नव्हते. घरातल्या सदस्यांनी याबाबत विचारले असता, तिने काहीही सांगितले नाही. तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता घरच्यांनी वर्तवली आहे. घडलेल्या घटनेबद्दल ती महिला काही बोलत नसल्याने पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.