बंगळुरू - इन्फोसीस संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणामुळे ओळखल्या जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सुधा मूर्ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: पुढाकार घेऊन काम करत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लागणाऱ्या आवश्यक सामनाचे पॅकेजींग करताना त्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
कर्नाटकातील पुरामुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. लोकांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. यातच मूर्ती यांचे निवासस्थान असणाऱ्या जयानगरमधूनही पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. यावेळी सुधा मूर्ती स्व:ता सामानाची बांधणी करताना दिसत आहेत. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
सुधा मूर्ती या इन्फोसीस संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच त्यांनी लिहिलेली कन्नड आणि इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.