गांधीनगर - भारतीय वायुसेनेच्या ३ महिला अधिकाऱ्यांनी सोमवारी एमआय-१७ हेलीकॉप्टरचे यशस्वी उड्डाण करून इतिहास रचला. फ्लाइट लेफ्टनंट पारुल भारद्वाज (सह-पायलट) यांच्यासह फ्लाइंग ऑफिसर अमन निधी (सह-पायलट) आणि फ्लाइट लेफ्टनंट हीना जयस्वाल (फ्लाइट इंजीनियर) यांनी नैऋत्य हवाई कमांड येथून उड्डाण केले. त्या हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या 'ऑल-वीमेन टीम'च्या सदस्य बनल्या आहेत.
लष्करी सूत्रांनुसार, यातील २ महिला सदस्य पंजाबच्या आहेत. एमआय-१७ व्ही ५ हेलीकॉप्टरमधून उड्डाण करणे हे या महिलांच्या उड्डाण युद्ध प्रशिक्षणाचा भाग होते. त्यांनी नैऋत्य हवाई कमांडमध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या पुढे जाऊन हेलीकॉप्टर यशस्वीपणे जमिनीवर उतरवले.