जर्मनी/पटना - जर्मनीमध्ये राहणाऱ्या बिहारी लोकांनी उत्साहाने दिवाळी साजरी केली. यामध्ये सर्वजण आपल्या पारंपरीक लोकगीतांवर नृत्य करताना सुद्धा पाहायला मिळाले.
देशात सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विदेशात राहणारे भारतीय दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असतात. यंदा दिवाळीसाठी जर्मनीमधील वेगवेगळ्या भागात राहणारे बिहारी लोक एकत्र जमले. सर्वांनी पारंपरिक वेशभुषा केली होती. त्यानंतर दिवाळी साजरी केली. मात्र, यावेळी फटाके उडवून प्रदुषण करण्याचे त्यांनी टाळले. याउलट त्यांनी आपल्या पारंपरीक लोकगीतांवर नृत्यू करून आनंदोत्सव साजरा केला.