ETV Bharat / bharat

चीनमधून ३२४ भारतीय दिल्लीत दाखल, वैद्यकीय तपासणी सुरू

या भारतीयांमध्ये ३ अल्पवयीन आणि २११  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील १४ दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आणखी ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बळींची संख्या २५९ वर पोहोचली आहे.

author img

By

Published : Feb 1, 2020, 11:39 AM IST

Updated : Feb 1, 2020, 11:52 AM IST

Indians
चीनमधून ३२४ भारतीय दिल्लीत दाखल

दिल्ली - चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणुची झळ आपल्या नागरिकांना बसू नये, यासाठी भारत सरकारने वुहानमधून तब्बल ३२४ भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट केले आहे. यातील काही नागरिकांना भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावला कॅम्पमध्ये तर इतरांना हरियाणाच्या मानेसरमधील सैन्य शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धसका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द!

या भारतीयांमध्ये ३ अल्पवयीन आणि २११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील १४ दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आणखी ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बळींची संख्या २५९ वर पोहोचली आहे. याशिवाय १२ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचीही माहितीही समोर येत आहे.

हेही वाचा - मुंबईत आढळले कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात दाखल

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.