नवी दिल्ली - कोरोनाविरोधात भारतील लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळण्यापासून आणखी दूर असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे. हर्षवर्धन यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सेरो सर्व्हे (Sero Survey) दाखला दिला आहे. आयसीएमआरचे पथक कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संवाद या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले, 'आयसीएमआरने दुसऱ्यांदा केलेल्या सेरो सर्व्हेचे निष्कर्ष लवकरच समोर येणार आहेत. मात्र, आपण हर्ड इम्युनिटी मिळविण्यापासून आणखी खूप दुर आहोत. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्याची गरज आहे. मे महिन्यात आयसीएमआरने पहिला सेरो सर्व्हे केला होता. त्यात देशातील फक्त ०.७३ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते
कोरोनाची लागण एखाद्या व्यक्तीस दुसऱ्यांदा होण्याच्या घटनांचाही सखोल तपास आयसीएमआरकडून सुरू आहे. त्यासंबंधी तज्ज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. देशातील कोविड रुग्णांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे.
काय आहे हर्ड ईम्युनिटी
जर देशातील ठराविक प्रमाणातील लोकांना एखाद्या संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपोआप प्रतिकार क्षमता निर्माण होते. त्यामुळे संसर्ग लोकांतून नाहीसा होतो. नक्की किती लोकसंख्येला लागण झाली तर हर्ड इम्युनिटी मिळते, याबाबत तज्ज्ञांत मतभेद आहेत.