नवी दिल्ली - पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना भारतात आण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.
Sources: Indian High Commission in Pakistan last evening gave a demarche to Pakistan Ministry of Foreign Affairs for immediate and safe return of Wing Commander Abhinandan. Similar Demarche was given to Pakistan's acting High Commissioner in New Delhi yesterday. pic.twitter.com/OSznWFajGB
— ANI (@ANI) February 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sources: Indian High Commission in Pakistan last evening gave a demarche to Pakistan Ministry of Foreign Affairs for immediate and safe return of Wing Commander Abhinandan. Similar Demarche was given to Pakistan's acting High Commissioner in New Delhi yesterday. pic.twitter.com/OSznWFajGB
— ANI (@ANI) February 28, 2019Sources: Indian High Commission in Pakistan last evening gave a demarche to Pakistan Ministry of Foreign Affairs for immediate and safe return of Wing Commander Abhinandan. Similar Demarche was given to Pakistan's acting High Commissioner in New Delhi yesterday. pic.twitter.com/OSznWFajGB
— ANI (@ANI) February 28, 2019
अभिनंदन यांना कोणतीही इजा व्हायला नको असे आवाहन भारताकडून पाकिस्तानला करण्यात आले आहे. शिवाय पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले आहे.
बुधवारी पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. याला भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडण्यात आले होते. मात्र, विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला यावेळी पाकिस्तान लष्कराकडून पकडण्यात आले. सद्या अभिनंदन भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी बुधवारी रात्री भारतीय उच्चायुक्तांकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात जावून अभिनंदन यांची सुटका करण्याची मागणी केली.