नवी दिल्ली : भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशातील दूरवरच्या एका तारांकित आकाशगंगेचा शोध लावला आहे. ही आकाशगंगा तब्बल ९.३ बिलियन प्रकाशवर्षे दूर आहे. देशातील पहिली मल्टी-वेव्हलेन्थ अवकाश वेधशाळा 'अॅस्ट्रोसॅट'चे हे मोठे यश मानले जात आहे. अवकाश विभागाने ही माहिती दिली.
दरम्यान, या शोधाबाबत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच 'नासा' या अवकाश संशोधन संस्थेने अॅस्ट्रोसॅटचे अभिनंदन केले आहे. विज्ञान हे एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात असते, आणि अशा शोधांमुळे मानवजातीला आपण कुठून आलो आहोत, कुठे जात आहोत, आणि अंतराळात आपण एकटेच आहोत का? याबाबतच्या आपल्या माहितीमध्ये वाढ होत जाते असे नासाने म्हटले आहे.
-
Landmark achievement by Indian Astronomers. Space observatory AstroSat discovers one of farthest galaxy of Stars in the Universe. Hailed by leading international journal “Nature Astronomy”. Very important clue for further study of Light in Universe. pic.twitter.com/WLj6SUj6gT
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Landmark achievement by Indian Astronomers. Space observatory AstroSat discovers one of farthest galaxy of Stars in the Universe. Hailed by leading international journal “Nature Astronomy”. Very important clue for further study of Light in Universe. pic.twitter.com/WLj6SUj6gT
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 1, 2020Landmark achievement by Indian Astronomers. Space observatory AstroSat discovers one of farthest galaxy of Stars in the Universe. Hailed by leading international journal “Nature Astronomy”. Very important clue for further study of Light in Universe. pic.twitter.com/WLj6SUj6gT
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 1, 2020
याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह म्हणाले, की देशातील पहिल्याच मल्टी-वेव्हलेन्थ अवकाश वेधशाळेला एवढ्या दूरवरच्या आकाशगंगेमधून येणारी यूव्ही लाईट दिसून आली. या आकाशगंगेला एयूडीएफएस०१ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. कनक साहा यांच्या पथकाने या आकाशगंगेचा शोध लावला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित अशा 'नेचर अॅस्ट्रॉनॉमी' या नियतकालिकामध्येही याबाबत माहिती छापून आली आहे.
इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आययूसीएए) चे संचालक डॉ. सोमक रे चौधरी यांनी म्हटले, की विश्वाचे अंधकारमय युग कसे संपले आणि विश्वामध्ये प्रकाश कसा पडला याच्या शोधासाठी हा एक "अत्यंत महत्वाचा संकेत" आहे. या सर्वाची सुरुवात कधी झाली हे आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे, मात्र विश्वातील पहिला प्रकाश कुठून आला हे अद्यापही आपल्याला समजले नाही, असे ते म्हणाले.