ETV Bharat / bharat

'आकाशातील डोळा' : भारतीय लष्कराकडे लवकरच असणार स्वतःचा उपग्रह! - Indian Army Satellite

सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन घडवणारे हे अस्त्र म्हणजे उपग्रह असून केवळ लष्कराच्या गरजा भागवण्यासाठी हा उपग्रह समर्पित केला जाणार आहे. लवकरच तो अवकाशात सोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. अत्यंत उच्च रिझोल्यूशन असलेल्या प्रतिमा घेण्याची क्षमता या उपग्रहाकडे आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे. लवकरच तो अवकाशात झेपावेल, असे या घडामोडीशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

Indian Army to soon have its very own satellite an eye in the sky
'आकाशातील डोळा' : भारतीय लष्कराकडे लवकरच असणार स्वतःचा उपग्रह!
author img

By

Published : Feb 4, 2020, 12:58 PM IST

बाह्य कुरापत आणि अंतर्गत सुरक्षा स्थितीसंदर्भात चिरंतन दक्षता म्हणून भारतीय लष्कराला स्वतःचे असे एक जबरदस्त अस्त्र मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन घडवणारे हे अस्त्र म्हणजे उपग्रह असून केवळ लष्कराच्या गरजा भागवण्यासाठी हा उपग्रह समर्पित केला जाणार आहे. लवकरच तो अवकाशात सोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. अत्यंत उच्च रिझोल्यूशन असलेल्या प्रतिमा घेण्याची क्षमता या उपग्रहाकडे आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे. लवकरच तो अवकाशात झेपावेल, असे या घडामोडीशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

लष्कराचे संदेशवहन, सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), टेहळणीच्या गरजा भागवणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे हे त्याचे मुख्य काम असेल. तसेच या उपग्रहामुळे लष्कराकडून केले जात असलेले सर्वात ताजे ड्रोन कार्यचालन सोपे होणार आहे, असेही या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. म्हणून लष्कराकडे त्याचे स्वतःचे अनन्य असे संपर्काचे नेटवर्क असेल. हे नेटवर्क सर्वाधिक सुरक्षित असून गुप्तता राखण्यास प्राधान्य असेल. सिग्नल्स संचालनालयाकडून ते हाताळले जाईल. या उपग्रहाची सुदूर संवेदनाची म्हणजे रिमोट सेन्सिंगची आणि टेहळणीची क्षमता यामुळे उपग्रह आकाशातील डोळा असेल.

पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करणे त्यामुळे लष्कराला सोपे जाणार आहे. त्याशिवाय सीमेवरील सैन्याच्या हालचालींवर देखरेख, सीमेलगत सर्वत्र तैनात केलेल्या सैन्याची ठिकाणे यावर नजर ठेवणे यासाठी लष्कराला त्याची मदत होणार आहे. सीमाप्रदेशाशिवाय, उपग्रह महत्वाची लष्करी ठिकाणे आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरही नजर ठेवणार आहे.

भारताच्या ५५ उपग्रहांपैकी, ८ ते १० उपग्रह लष्करी उद्देश्याची सेवा करतात. नजीकच्या भविष्यात आणखी लष्करी उपग्रह अवकाशात सोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत इस्रोने ३४ देशांच्या मालकीचे ३२७ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. पीएसएलव्ही-सी३७ या मोहिमेंतर्गत भारताने १५ फेब्रुवारी २०१७ ला विक्रमी संख्येने म्हणजे १०४ उपग्रह अवकाशात सोडले होते. ही अत्यंत महत्वाची कामगिरी होती. भारताचा कार्टोसॅट-३ उपग्रह नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाशात झेपावला होता. ५०० किमी. अंतरावरूनसुद्धा २५ सेंमी. इतकी बारीक वस्तु ओळखण्याची त्याची अद्भूत क्षमता आहे. भारतीय उपग्रहाने साध्य केलेले हे सर्वोत्कृष्ट पृथःकरण आहे.

एप्रिल २०१९ मध्ये, भारताच्या इस्रोने ईएमआयएसएटी उपग्रह अवकाशात सोडला. जमिनीवर येणारे इलेक्ट्रॉनिक संदेश अत्यंत बारकाईने ओळखण्याची त्याची क्षमता आहे. याचा अर्थ असा की, शत्रूचे लपवलेले संदेशवहनाची उपकरणे आणि रडारसह लावलेली यंत्रे भारताच्या नजरेतून आता सुटणार नाहीत. दुसरा उपग्रह मायक्रोसॅट आर हा तर रात्रीच्या अंधारातही प्रतिमा घेण्याची क्षमता बाळगून आहे. भारतीय नौदलाकडे स्वतःचा समर्पित रूक्मिणी हा उपग्रह असून ऑगस्ट २०१३ मध्ये तो सोडला होता. भारतीय हवाई दलाकडे जीएसएटी-७ ए हा उपग्रह आहे. तो डिसेंबर २०१८ मध्ये अवकाशात सोडण्यात आला होता. यातील मनोरंजक गोष्ट ही आहे की, केंद्रीय गृहमंत्रालयही स्वतःचा समर्पित उपग्रह अवकाशात सोडण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. प्राथमिकतः सीआरपीएफ आणि बीएसएफ या निमलष्करी दलाच्या गरजा तो भागवणार आहे. तसेच दहशतवादाचा, अतिरेक्यांचा आणि डाव्या गटाच्या अतिरेकीवादाचा मुकाबला करताना सैन्यदलाचे नेतृत्व करेल.

गृहमंत्रालयाने अंतर्गत अभ्यासाच्या शिफारशींवर काम करण्यास सुरुवात केली आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून समर्पित उपग्रहाची शिफारस अभ्यासात केली आहे, असे अधिकाऱ्यांने पुढे सांगितले. समर्पित लष्करी आणि सुरक्षा उपग्रह एकमेकांच्या भारताच्या २४,६०० कोटी रूपयांच्या स्पेक्ट्रम नेटवर्कच्या अनुषंगाने काम करतील. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट संवेदनशील गुप्त माहितीचे संरक्षण करणे आणि भारताच्या सशस्त्र दलांच्या विविध शाखांमधील अंतर्गत आणि परस्परांमधील संघटनात्मक संदेशवहनाची सर्वाधिक सुरक्षा राखेल. ध्वनी, व्हिडिओ आणि डेटा विनिमय यांच्याशिवाय, एनएफएस अत्यंत आधुनिक नेटवर्कबरोबर सहज मिश्रित होईल. ते बिग डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमता यांच्याशी संबंधित उपयोजनांना सामावून घेईल.

- संजीव के बारूआ

हेही वाचा : आंध्र प्रदेश विधान परिषदेच्या चंद्राप्रमाणे बदलणाऱ्या कला...

Intro:Body:

भारताच्या ५५ उपग्रहांपैकी, ८ ते १० उपग्रह लष्करी उद्देश्याची सेवा करतात. नजीकच्या भविष्यात आणखी लष्करी उपग्रह अवकाशात सोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत इस्रोने ३४ देशांच्या मालकीचे ३२७ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. पीएसएलव्ही-सी३७ या मोहिमेंतर्गत भारताने १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी विक्रमी संख्येने म्हणजे १०४ उपग्रह अवकाशात सोडले होते. ही अत्यंत महत्वाची कामगिरी होती. भारताचा कार्टोसॅट-३ उपग्रह नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाशात झेपावला होता. ५०० किमी. अंतरावरूनसुद्धा २५ सेंमी. इतकी बारीक वस्तु ओळखण्याची त्याची अद्भुत क्षमता आहे. भारतीय उपग्रहाने साध्य केलेले हे सर्वोत्कृष्ट पृथःकरण आहे.

एप्रिल २०१९ मध्ये, भारताच्या इस्रोने ईएमआयएसएटी उपग्रह अवकाशात सोडला. जमिनीवर येणारे इलेक्ट्रॉनिक संदेश अत्यंत बारकाईने ओळखण्याची त्याची क्षमता आहे. याचा अर्थ असा की, शत्रुचे लपवलेले संदेशवहनाची उपकरणे आणि रडारसह लावलेली यंत्रे भारताच्या नजरेतून आता सुटणार नाहीत. दुसरा उपग्रह मायक्रोसॅट आर हा तर रात्रीच्या अंधारातही प्रतिमा घेण्याची क्षमता बाळगून आहे. भारतीय नौदलाकडे स्वतःचा समर्पित रूक्मिणी हा उपग्रह असून ऑगस्ट २०१३ मध्ये तो सोडला होता. भारतीय हवाई दलाकडे जीएसएटी-७ ए हा उपग्रह आहे. तो डिसेंबर २०१८ मध्ये अवकाशात सोडण्यात आला होता. यातील मनोरंजक गोष्ट ही आहे की, केंद्रिय गृहमंत्रालयही स्वतःचा समर्पित उपग्रह अवकाशात सोडण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. प्राथमिकतः सीआरपीएफ आणि बीएसएफ या निमलष्करी दलाच्या गरजा तो भागवणार आहे. तसेच दहशतवादाचा, अतिरेक्यांचा आणि डाव्या गटाच्या अतिरेकीवादाचा मुकाबला करताना सैन्यदलाचे नेतृत्व करेल.

गृहमंत्रालयाने अंतर्गत अभ्यासाच्या शिफारशींवर काम करण्यास सुरूवात केली आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून समर्पित उपग्रहाची शिफारस अभ्यासात केली आहे, असे अधिकार्यांने पुढे सांगितले. समर्पित लष्करी आणि सुरक्षा उपग्रह एकमेकांच्या भारताच्या २४,६०० कोटी रूपयांच्या स्पेक्ट्रम नेटवर्कच्या अनुषंगान काम करतील. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट संवेदनशील गुप्त माहितीचे संरक्षण करणे आणि भारताच्या सशस्त्र दलांच्या विविध शाखांमधील अंतर्गत आणि परस्परांमधील संघटनात्मक संदेशवहनाची सर्वाधिक सुरक्षा राखेल. ध्वनी, व्हिडिओ आणि डेटा विनिमय यांच्याशिवाय, एनएफएस अत्यंत आधुनिक नेटवर्कबरोबर सहज मिश्रित होईल. ते बिग डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्घिमत्ता यांच्याशी संबंधित उपयोजनांना सामावून घेईल.

- संजीव के बारूआ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.