ETV Bharat / bharat

भारतीय वायुसेनेचे आयएएफ एएन-३२ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

१२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विमानाचा संपर्क तुटला होता. मेनचुका हवाईक्षेत्रात विमान बेपत्ता झाले होते. ३ वर्षांपूर्वीही आयएएफ एएन-३२ विमान बेपत्ता झाले होते. परंतु, त्याचा अद्यापही शोध लागला नाही. या विमानात २९ प्रवासी होते.

author img

By

Published : Jun 3, 2019, 4:12 PM IST

Updated : Jun 3, 2019, 10:42 PM IST

आएएफ एएन-३२

नवी दिल्ली - आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे लष्करी विमान बेपत्ता झाले आहे. विमान अरुणाचल प्रदेश येथील मेनचुका विमानतळाकडे निघाले होते. विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी आहेत. १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विमानाचा संपर्क तुटला आहे. मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करुन माहिती देताना लिहिले आहे, की मी एअर मार्शल राकेश सिंह भादौरिया यांच्याकडून बेपत्ता विमान घटनेची माहिती मागवली आहे. सद्यपरिस्थितीबद्दल भारतीय वायुसेना काय पावले उचलत आहे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. एअर मार्शलनी मला परिस्थितीबद्दल सर्व माहिती दिली आहे. मी विमानातील सर्व वायुसेनेचे सर्व कर्मचारी सुखरुप असावेत, अशी प्रार्थना करतो.

भारतीय वायुसेनेकडून शोधकार्य सुरू

भारतीय वायुसेनेकडून सुखोई-३० कॉम्बॅट आणि सी-१३० विशेष ओपीएस विमाने शोधकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. ही विमाने आएएफ-३२ संपर्क तुटलेल्या ठिकाणावर जाऊन शोध घेणार आहेत.

रशियन बनावटीचे आयएएफ एएन-३२ हे विमान १९८० साली वायुसेनेत दाखल करण्यात आले होते. यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाद्वारे बदल करण्यात येत होते. परंतु, सद्या झालेल्या बेपत्ता विमानात नवीन बदल करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.

३ वर्षांपूर्वीही आयएएफ एएन-३२ विमान झाले होते बेपत्ता

२२ जुलै २०१६ रोजी आयएएफ एएन-३२ विमान २९ प्रवाशांना घेवून उडाले होते. चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे (अंदमान आणि निकोबार) निघालेले हे विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले होते. यासाठी शोधकार्य राबवण्यात आले होते. पण अजूनही या विमानाचा शोध लागला नाही.

Intro:Body:

ajay

Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.