नवी दिल्ली - भारतीय वायुसेना फॉरेन्सिक पथकाला फ्रान्स दौऱ्यावर पाठवणार आहे. गेल्या रविवारी रात्री राफेल प्रकल्पाची गोपनीय कागदपत्रे ठेवलेल्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली होती. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय वायुसेनेकडून फॉरेन्सिक पथक पाठवण्यात येणार आहे.
राफेल प्रकरणातील कागदपत्रे ठेवलेल्या फ्रेंच दसॉल्ट एव्हीएशनच्या कार्यालयामध्ये अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली होती. ऑफिसमध्ये राफेल प्रकरणातील भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची गोपनीय माहिती आहे. यामध्ये माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकारानंतर कोणतीही हार्ड डिस्क किंवा फाईल चोरी गेलेली नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची सॉफ्ट कॉपी चोरीला गेली आहे किंवा कोणतीही कच्ची माहिती चोरीला गेलेली नाही, याचा तपास फॉरेन्सिक पथकातर्फे करण्यात येणार आहे.