हैदराबाद - भारतामध्ये कोरोना रुग्ण संख्येने 96 लाखाचा आकडा पार केला आहे. तर यात जवळपास 4 लाख कोरोना रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत.
रविवारी 32 हजार 981 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या 96 लाख 77 हजार 203 वर पोहचली आहे. तर 391 रुग्णांचा मृत्यूनंतर देशात आतापर्यंत कोरोनमुळे एकूण 1 लाख 40 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 96 हजार 729 रुग्ण सक्रिय आहेत.
कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा देशात फक्त कोरोना चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती. मात्र, सध्या देशात तब्बल 2 हजार 207 प्रयोगशाळा आहेत. यात 1 हजार 188 सरकारी आणि 1 हजार 19 खासगी प्रयोगशाळा आहेत. रविवारी 8 लाख 1 हजार 81 कोरोना चाचण्या करण्यता आल्या असून आतापर्यंत तब्बल 14 कोटी 77 लाख 87 हजार 656 चाचण्या झाल्या आहेत.
इंग्लंडमध्ये उद्यापासून मिळणार लस..
कोरोना लसीकडे जगाचे लक्ष लागले आहे. ‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. त्यानंतर आता सिरमनेही परवानगी मागितली आहे. इंग्लंडने फायझर लसीला आधीच परवानगी दिली आहे. कोरोनावरील मान्यताप्राप्त लस म्हणून ती पहिली लस ठरली आहे.
हेही वाचा - उद्या 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा