ETV Bharat / bharat

ऐतिहासिक! भारताने हायपरसोनिक तंत्रज्ञानाची ओदिसामध्ये घेतली यशस्वी चाचणी - Rajnath Singh on hypersonic technology

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हायपरसोनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर डीआरडीओ टीमचे अभिनंदन केले आहे.

हायपरसोनिक तंत्रज्ञान
हायपरसोनिक तंत्रज्ञान
author img

By

Published : Sep 7, 2020, 5:15 PM IST

नवी दिल्ली - भारताने ऐतिहासिक अशा हायपरसोनिक तंत्रज्ञानाची ओदिसामध्ये यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात हायरपरसोनिक लांब पल्ल्याचे शक्तिशाली क्षेपणास्त्र विकसित करणे शक्य होणार आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान डीआरडीओने विकसित केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हायपरसोनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर डीआरडीओ टीमचे अभिनंदन केले आहे. ही महत्त्वाची कामगिरी असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनच्या दिशेने जात आहोत. प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. भारताचा त्यांना अभिमान आहे. नव्या पिढीतील हायपरसोनिक वाहनांचा विकास करणे शक्य असल्याचे डीआरडीओ अधिकाऱ्याने सांगितले.

  • Successful flight test of Hypersonic Technology Demonstration Vehicle (HSTDV) from Dr. APJ Abdul Kalam Launch Complex at Wheeler Island off the cost of Odisha today. pic.twitter.com/7SstcyLQVo

    — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ चौथा देश ठरला आहे. ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम चाचणी केंद्रावर भारताने हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगवान लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करणे शक्य आहे.

  • The @DRDO_India has today successfully flight tested the Hypersonic Technology Demontrator Vehicle using the indigenously developed scramjet propulsion system. With this success, all critical technologies are now established to progress to the next phase.

    — Rajnath Singh (@rajnathsingh) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने संरक्षणसिद्धता वाढविण्यास सुरुवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.