ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 1 कोटींचा टप्पा; मृत्यू दर 1.45 वर

कोरोना रुग्णांचा आकडा एक कोटीवर पोहोचला असला तरी रिकव्हरी रेट दिलासादायक आहे. आतापर्यंत 95.46 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच 95 लाख 50 हजार 712 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 8 हजार 751 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच मृत्यू दर हा 1.45 वर आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 19, 2020, 1:38 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरामध्ये 25 हजार 153 नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील रुग्णांचा आकडा 1 कोटी 4 हजार 599 वर पोहचला आहे. तर नव्याने 347 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 1 लाख 45 हजार 136 बळी गेला आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा एक कोटीवर पोहोचला असला तरी रिकव्हरी रेट दिलासादायक आहे. आतापर्यंत 95.46 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच 95 लाख 50 हजार 712 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 8 हजार 751 जणांवर उपचार सुरू आहेत. तर मृत्यू दर हा 1.45 वर आहे.

कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला.

राज्यनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी -

शुक्रवारी दिवसभरात 11 लाख 71 हजार 868 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 16 कोटी 90 हजार 514 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. राज्यनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता सर्वांत जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळली आहे. महारष्ट्रात सध्या 61 हजार 471 रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. त्यानंतर केरळ, कर्नाटक पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये रुग्ण आहेत.

भारत 'स्पुटनिक व्ही'च्या 300 दशलक्ष डोसची करणार निर्मिती -

भारत 2021 मध्ये रशियन कोरोना विषाणूविरोधी लस स्पुटनिक व्हीच्या सुमारे 300 दशलक्ष डोसची निर्मिती करेल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) शुक्रवारी दिली. चार मोठ्या उत्पादकांसह यासाठीची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी 10 उत्पादने साइटस निवडल्या गेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. कोरिया, ब्राझील आणि चीनसारख्या इतर देशांमध्ये स्पुतनिक व्हीचे उत्पादन यापूर्वीच सुरू झाले असल्याची माहिती आरडीआयएफचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी दिली.

हेही वाचा - पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनुकूल करणे : मूल्यांकन पीएमएफबीवायचे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.