ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात देशात आढळले 14 हजार 821 कोरोनाबाधित; तर 445 जणांचा बळी

author img

By

Published : Jun 22, 2020, 10:49 AM IST

देशात 4 लाख 25 हजार 282 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 74 हजार 387 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 37 हजार 196 जण बरे झाले आहेत. तर, 13 हजार 699 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या नव्या रुग्णांनी 14 हजारांचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 14 हजार 821 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 445 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 6 हजार 170 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 32 हजार 75 वर गेली आहे. यातील एकूण 60 हजार 161 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 65 हजार 744 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 59 हजार 746 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 175 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 हजार 558 रुग्ण सक्रिय आहेत. तर 33 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरात राज्यात 27 हजार 260 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 663 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 19 हजार 349 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 6 हजार 248 रुग्ण सक्रिय आहेत.

तामिळनाडूमध्ये 59 हजार 377 कोरोनाबाधित तर 757 जणांचा बळी गेला आहे. तसेच 32 हजार 754 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 25 हजार 866 जणांवर उपचार सुरू आहेत.

अंदमान- निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली, गोवा, मणिपूर, मिझारोम, नागालँड, सिक्किम आणि येथे एकही कोरोनाबाधिताचा अद्याप मृत्यू झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.