नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे तब्बल 2 हजार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजार 974 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखापेक्षा अधिक झाला आहे.
देशात 3 लाख 54 हजार 65 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 55 हजार 227 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 1 लाख 86 हजार 935 जण बरे झाले आहेत. तर, 11 हजार 903 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती.
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 5 हजार 537 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 13 हजार 445 वर गेली आहे. यातील एकूण 50 हजार 57 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 57 हजार 851 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
नवी दिल्लीमध्ये 44 हजार 688 कोरोनाबाधित आहेत. तर 1 हजार 837 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यात 24 हजार 557 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 433 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. तामिळनाडूमध्ये 48 हजार 19 कोरोनाबाधित तर 528 जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान अंदमान- निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, गोवा,दादरा -नगर हवेली- दमन आणि दिव, मणिपूर, मिझारोम, नागालँड आणि सिक्किम येथे एकही कोरोनाबाधिताचा अद्याप मृत्यू झालेले नाही.