ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात देशात आढळले नवे 9 हजार 985 रुग्ण; तर 279 जणांचा बळी - coronavirus india live update

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 76 हजार 583 वर पोहोचला आहे. तर 7 हजार 745 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 10, 2020, 10:58 AM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 985 कोरोनाबाधित आढळले असून 279 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. 2 लाख 76 हजार 583 कोरोनाबाधित देशात आढळले आहेत. यात 1 लाख 33 हजार 632 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 1 लाख 35 हजार 206 जण पूर्णत: बरे झाले असून 7 हजार 745 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन अधिक शिथिल करण्यात आल्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यानिहाय स्थिती...

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 90 हजार 787 असून 3 हजार 289 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 307 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 914 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिल्लीमध्ये 31 हजार 909 आणि गुजरात राज्यात 21 हजार 14 कोरोनाबाधित आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाला असून त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 1 हजार 313 व दिल्लीमध्ये 905 जणांचा बळी गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.