ETV Bharat / bharat

'कोरोना संकटात गरजुंना वाचवण्यासाठी भारताला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील' - Randeep Surjewala

खासदार राहुल गांधींनी आज रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे संवांद साधला. कोरोनाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, यावरदेखील राहुल गांधींनी राजन यांच्याशी चर्चा केली.

Raghuram Rajan to Rahul
'कोरोनाच्या संकटात गरजुंना वाचवण्यासाठी भारताला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील'
author img

By

Published : Apr 30, 2020, 12:46 PM IST

नवी दिल्ली - खासदार राहुल गांधींनी आज रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे संवांद साधला. कोरोनाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, यावरदेखील राहुल गांधींनी राजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी रघुराम राजन यांनी सांगितले की कोरोना विषाणुच्या या संकटकाळात भारताला गरिबांना जगवण्यासाठी ६५ हजार कोटी रुपये लागतील.

सध्याच्या परिस्थितीत देशातील गरजूंना मदत करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, या राहुल गांधीच्या प्रश्नाला राजन यांनी उत्तर दिले. पुढे बोलताना राजन सांगतात, की देशाला ६५ हजार कोटी लागतील आणि आपल्या जीडीपीला ही रक्कम परवडणारी आहे. आपल्या देशाचा जीडीपी २०० लाख कोटी आहे. त्यापैकी ६५ हजार कोटी ही फार मोठी रक्कम नाही. गरीबांना जगवायचे असेल, तर एवढी रक्कम खर्च करणे गरजेचे आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन उघडण्यासाठी भारताने विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे ठरेल. तसेच अर्थव्यवस्थादेखील लवकरात लवकर खुली करावी लागेल. अशा संकटाच्या वेळी आपण विभाजीत राहण्याचा धोका स्वीकारूशकत नाही, असे राजन सांगतात.

भारत संधी शोधू शकतो -

कोरोनानंतर भारताला काही धोरणात्मक फायदा होईल का, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. या उत्तरात राजन सांगतात की अशा संकटांचा, घटनांचा क्वचितच सकारात्मक फायदा देशाला होऊ शकतो. काही असे मार्ग आहेत, ज्याद्वारे देश याचा फायदा घेऊ शकतो.

अशा परिस्थितीत भारत आपल्या उद्योगांसाठी पुरवठा साखळी शोधू शकेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक व्यवस्थेत अधिक चांगले स्थान आणि अवस्था असलेल्या देशांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतो, असे त्यांनी सुचविले.

लोकांच्या उदरनिर्वाहाविषयी विचार करणे गरजेचे -

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताला जर तिसऱ्या लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विनाशक ठरेल, असा इशाराही रघुराम राजन यांनी दिला. "वैद्यकीय सुविधा पुरवून या संक्रमणाला रोखण्याचा रुग्णालये चांगला प्रयत्न करत आहेत. मात्र, या रुग्णालयांचे कौतूक करण्यात हुरळून न जाता लोकांच्या उदरनिर्वाहाबद्दल विचार करायला हवा. लॉकडाऊन कायम ठेवणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर असले तरी अर्थव्यवस्थेसाठी ते योग्य नाही, असेही राजन सांगतात.

लॉकडाऊन काढण्यासाठी कुठलाही निर्णय घेतांना त्याच्या परिणामांचा विचार करणेदेखील महत्वाचे ठरते. कारण लॉकडाऊन हटवणे म्हणजे, फक्त कार्यालये सुरू करणे, नव्हे. तर त्या कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणाहून परत येताना फिजिकल डिस्टंन्स पाळला जाणे फार महत्वाचे आहे, असेही राजन यांनी सांगितले.

दिवसाला दोन दशलक्ष चाचण्यांची आवश्यकता -

चाचण्या वाढविण्याच्या गरजेवर जोर देताना राजन म्हणाले, अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याविषयी खरोखर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला सध्या भारतात होत असलेल्या चाचण्या तीनपट वाढवाव्या लागतील.

या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, भारतात एक खोल बसलेली असमानतेची पातळी आहे. त्यासाठी आपल्या देशात बरेच सामाजिक बदल आवश्यक आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. या सर्वांसाठी एकच उपाय कामाचा नसेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.