ETV Bharat / bharat

काश्मीरात घुसखोरी करण्याचा दहशतावाद्यांचा कट लष्कराने लावला उधळून - नियंत्रण रेषा भारत पाक

भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये घुसखोरी करणाचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा कट उधळून लावला होता.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Sep 27, 2019, 3:21 PM IST

श्रीनगर - भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये घुसखोरी करणाच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा कट उधळून लावला होता. याबाबतची एक व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने दिला आहे. त्यामध्ये नियंत्रण रेषेवर काही व्यक्तींची हालचाल दिसून येत आहे. भारतीय सैन्याने गोळीबार केल्यानंतर दहशतवादी पुन्हा माघारी पळून गेल्याची या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ३० जुलैचा हा व्हिडिओ असल्याची माहीती समजत आहे.

  • Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmir’s Kupwara sector on 30 Jul.Indian troops started firing at them as soon as terrorists were detected&forced them to return to their territory.They were attempting to infiltrate&carry out attacks on Indian positions. pic.twitter.com/WlKT9VF6Cd

    — ANI (@ANI) September 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा भागामध्ये पाक व्याप्त काश्मीरमधून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची हालचाल भारतीय लष्कराने टिपली. गोळीबार करताच दहशतवादी माघारी पळून गेले. काश्मीरमध्ये घुसखोरी करुन हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती मिळत आहे.

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने भारतामध्ये हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तान त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहितीही भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. हल्ला होण्याची माहिती मिळाल्याने भारताच्या किनारी भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.