नवी दिल्ली - चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतच आहे. देशातील कोरोना रुग्णांनी 66 लाखांचा टप्पा पार केला असून गेल्या 24 तासांमध्ये देशात 74 हजार 442 रुग्ण आढळले आहेत. तर, 903 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची आकेडवारी 66 लाख 23 हजार 815 वर पोहचली आहे. तर, 9 लाख 34 हजार 427 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच, आतापर्यंत 55 लाख 86 हजार 703 जण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर 1 लाख 2 हजार 685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 9 लाख 89 हजार 860 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 99 लाख, 82 हजार 394 एवढी झाली आहे.
जागतिक आकेडवारी पाहता, जगभरात 3 कोटी 53 लाख 88 हजार 157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 10 लाख 41 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 2 कोटी 66 लाख 9 हजार 676 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जागतिक आकडेवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ ब्राझील, रशिया, कोलंबिया आणि पेरूमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.