नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णांनी 64 लाखांचा टप्पा पार पडला आहे. गेल्या 24 तासांत 81 हजार 484 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची आकडेवारी 99 हजार 773 वर पोहचली आहे. तर, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 94 हजार 68 झाली आहे.
देशात 9 लाख 42 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरू असून 53 लाख 52 हजार 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि, गुरुवारी दिवसभरात 10 लाख 97 हजार 947 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 67 लाख, 17 हजार 728 एवढी झाली आहे.
राज्यनिहाय मृत्यूची आकडेवारी पाहता सर्वांत जास्त 37 हजार 56 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये 9 हजार 586, कर्नाटकात 8 हजार 994 जणांचा बळी गेला आहे. मिझोराममध्ये अद्याप एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून 328 जणांवर उपचार सुरू आहेत.