ETV Bharat / bharat

National Updates : देशातील सर्व ठळक घडामोडींचा धावता आढावा..

India COVID-19 LIVE Updates
India COVID-19 LIVE Updates
author img

By

Published : May 7, 2020, 9:25 AM IST

Updated : May 7, 2020, 8:45 PM IST

19:40 May 07

३७ आयटीबीपी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण..

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)च्या ३७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व दिल्लीमध्ये कार्यरत होते. यानंतर आयटीबीपीमधील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या ९०वर पोहोचली आहे.  

19:38 May 07

उत्तर प्रदेशमधील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर..

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये आज कोरोनाचे ७३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ३,०७१ रुग्ण असून, आतापर्यंत १,२५० रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, ६२ रुग्णांचा यात बळी गेला आहे.

19:37 May 07

सीआयएसएफच्या एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू..

मुंबई - शहरामध्ये ड्यूटीवर असलेल्या एका सीआयएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

19:33 May 07

जम्मू काश्मीरमध्ये एकाच दिवसात ३,४२९ चाचण्या, १८ लोक आढळले पॉझिटिव्ह

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये आज एका दिवसात ३,४२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधील १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७९३ झाली आहे. यांपैकी जम्मूमध्ये ६८, तर काश्मीरमध्ये ७२५ रुग्ण आहेत.

19:30 May 07

पंजाबमध्ये दिवसभरात आढळले ११८ नवे रुग्ण, एकूण बाधितांची संख्या १,६४४वर..

चंदीगड - पंजाबमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ११८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६४४वर पोहोचली आहे. तसेच आज झालेल्या एका मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या २८ झाली आहे.

19:27 May 07

तामिळनाडूमध्ये बॉयलरच्या स्फोटात सात जखमी..

चेन्नई - तामळनाडूच्या कुड्डलोर जिल्ह्यामधील वीज कंपनीमध्ये झालेल्या एका बॉयलरच्या स्फोटात सात जण जखमी झाले आहेत. नेयवेली लिगनाईट कॉर्पोरेशन लिमिटेड असे या वीजकंपनीचे नाव आहे.

18:28 May 07

विशाखापट्टणममधील वायुला निष्प्रभ करण्यासाठी गुजरातहून पाठवणार केमिकल..

अहमदाबाद - विशाखापट्टणममधील वायू गळतीमधून पसरलेल्या विषारी वायूला निष्प्रभ करण्यासाठी गुजरातहून खास रसायन पाठवण्यात येणार आहे. पीटीबीसी नावाचे हे विशेष रसायन केवळ गुजरातच्या वापीमध्येच बनवण्यात येते.

18:26 May 07

तामिळनाडूमध्ये ५८० नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण साडेपाच हजारांच्या घरात..

चेन्नई - तामिळनाडूमध्ये आज दिवसभरात ५८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५,४०९वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

18:24 May 07

जेईई-अ‌ॅडव्हान्स्ड परिक्षा होणार २३ ऑगस्टला..

नवी दिल्ली - जेईई अ‌ॅडव्हान्स्ड ही परीक्षा २३ ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

18:22 May 07

कर्नाटकात गेल्या २४ तासांमध्ये १२ नव्या रुग्णांची नोंद..

बंगळुरू - कर्नाटकामध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकूण १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७०५ झाली आहे. यामधील ३६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

18:17 May 07

केरळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही रुग्ण नाही..

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५०२च राहिली आहे. तसेच राज्यातील अ‌ॅक्टिव रुग्णांची संख्याही कमी होऊन २५ वर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

18:13 May 07

आसाममधील पहिल्या कोरोना रुग्णाला मिळाला डिस्चार्ज..

गुवाहाटी - आसाममधील पहिला कोरोना रुग्ण, जो कर्करोगग्रस्तही होता; त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आसाममधील मंत्री हिमंता बिसवा शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. यासोबतच, आसाममध्ये परत येणाऱ्या कामगारांपैकी जे कामगार दुसऱ्या राज्यांमधील रेड झोनमधून येणार आहेत, त्या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

17:52 May 07

विविध राज्यांमधील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या जाहीर..

पंजाब आणि आसाम सरकारांनी आपापल्या राज्यांमधील शाळांना उन्हाळयाच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. पंजाबमध्ये १५ मे ते १५ जून, तर आसाममध्ये १ मे ते ३१ मेपर्यंत उन्हाळी सुट्ट्या असणार आहेत.

17:47 May 07

कर्नाटकमध्ये अडकलेल्या मजूरांच्या मदतीसाठी राज्य सरकारने इतर राज्यांना केली विनंती..

बंगळुरू - कर्नाटक सरकारने विविध राज्य सरकारांना पत्र लिहित श्रमिक विशेष रेल्वे चालवण्याची परवानगी मागितली आहे. जेणेकरून, कर्नाटकमध्ये अडकलेल्या त्या-त्या राज्यांमधील कामगारांना आपल्या राज्यात परत जाता येईल.

यामध्ये झारखंड, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि राजस्थानचा समावेश आहे.

17:40 May 07

दिल्लीच्या गौतमबुद्धनगरमध्ये आढळले दहा नवे रुग्ण..

नवी दिल्ली - दिल्लीच्या गौतमबुद्धनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे दहा नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २०२ वर पोहोचली आहे. यामधील ९३ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत.

16:12 May 07

इंदूरमध्ये ३१ पोलिसांना कोरोनाची लागण..

भोपाळ - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एकूण ३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पूर्व इंदूरचे एसपी मोहम्मद युसूफ कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

16:07 May 07

अबुधाबीमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणले जाणार मायदेशी, दूतावासाचे मानले आभार..

दुबई - अबुधाबीमध्ये अडकलेल्या भारतीयांना आज वंदे भारत मोहीमेअंतर्गत मायदेशी आणण्यात येणार आहे. या नागरिकांनी भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत.

16:05 May 07

देशात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा..

नवी दिल्ली - देशात अडकलेल्या परदेशी नागरिकांना मायदेशी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. एअर इंडियाने अशा लोकांसाठी तिकीटांची बुकींग सुरू केली आहे.

14:54 May 07

विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडमध्येही वायूगळती; कागद कारखान्याचे सात कर्मचारी रुग्णालयात..

  • 7 workers of a Paper Mill hospitalised after being exposed to a gas leak reportedly while cleaning a tank in the mill, 3 of them are in critical condition: Raigarh Superintendent of Police #Chhattisgarh pic.twitter.com/T5XqB3ixyQ

    — ANI (@ANI) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रायपूर - छत्तीसगडच्या रायगडमधील एका कागद कारखान्यामध्येही झाली वायूगळती. सात कर्मचाऱ्यांना केले रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांपैकी तीन कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत माहिती दिली.

13:52 May 07

नाशिकमध्ये अडकलेले १३० भाविक पंजाबला रवाना..

  • 130 pilgrims who were at a Gurudwara in Manmad area of Nashik have been sent back to Punjab in buses arranged by Maharashtra Government. All the pilgrims have been medically screened and will be quarantined for 14 days on their arrival in Punjab. pic.twitter.com/pffGGcaoic

नाशिक - मनमाडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेल्या १३० भाविकांना पंजाबला परत पाठवण्यात आले आहे. या सर्व भाविकांची तपासणी करण्यात आली असून, पंजाबमध्ये गेल्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

13:45 May 07

देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर औषधांची चाचणी सुरू, आरोग्यमंत्र्यांची माहिती..

  • #WATCH ...Clinical trials of Ayush medicines like Ashwagandha, Yashtimadhu, Guduchi Pippali, Ayush-64 on health workers and those working in high risk areas has begun from today: Union Health Minister Dr Harsh Vardhan #COVID19 pic.twitter.com/dHKUMGCclX

नवी दिल्ली - आयुषने बनवलेल्या अश्वगंधा, यष्टीमधू, गुडूची पिप्पली आणि आयुष-६४ अशा औषधांची वैद्यकीय कर्मचाऱ्यावर चाचणी घेणे सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली.

13:36 May 07

केरळमधील कामगार उतरले रस्त्यावर, पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज..

  • #WATCH Kerala: Police resort to mild lathicharge in Koothattukulam area of Ernakulam District to disperse migrant labourers who were protesting demanding they be sent back to their native places. pic.twitter.com/b3O1MMZyEd

तिरुवअनंतपुरम - केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार रस्त्यांवर उतरले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

11:41 May 07

तामिळनाडूमधील मद्यविक्रीला आजपासून सुरूवात.. दुकानांबाहेर लागल्या लोकांच्या रांगा..

चेन्नई - तामिळनाडू राज्य सरकारने आजपासून राज्यातील मद्यविक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानांबाहेर आज सकाळपासूनच मद्यपींच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

11:39 May 07

ऑपरेशन समुद्र सेतूला सुरूवात.. आयएनएस जसश्वा पोहोचले मालेच्या बंदरावर..

माले - परदेशातील भारतीयांना समुद्रमार्गे परत आणण्यासाठी भारत सरकारने समुद्र सेतू मोहीमेला सुरूवात केली आहे. यासाठी आयएनएस जसश्वा हे मालदीवच्या माले येथील बंदरावर पोहोचले आहे.

11:37 May 07

दिल्लीमध्ये काल एकाच दिवसात वाढले ४२८ रुग्ण..

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये काल दिवसभरात एकूण ४२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,५३२ झाली आहे. यामधील १२ रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती शहराचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

10:38 May 07

धारावीत पालिका हतबल, कोरोना रुग्ण शोधण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजसेवकांना विनंती

मुंबई- शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यातच वरळी, धारावी सारखे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीमधील एकूण रुग्णांचा आकडा 733 वर पोहचला असून मृतांचा आकडा 21 वर पोहचला आहे. यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिका प्रशासन हतबल झाल्याने आता लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी कोरोना रुग्णांना विनंती करून क्वारंटाइन होण्याचे आवाहन करावे असे सांगितले आहे.

10:36 May 07

'मिशन वंदे भारत': पहिला टप्पा आजपासून सुरू; सिंगापूरमध्ये अडकलेले नागरिक मायदेशी आणणार

नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. आजपासून(गुरुवार) हे मिशन सुरू होत आहे. दिल्ली ते सिंगापूर अशी फ्लाईट आज रात्रीपासून सुरू होत आहे.

10:36 May 07

केरळमधील दोन चिमुकल्या भावांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिला पॉकेटमनी...

तिरुवनंतपूरम - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी समाजातील प्रत्येकाचा लढा सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान निधी आणि राज्यस्तरावर मुख्यमंत्री निधी गोळा केला जात आहे. यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केरळमधील मलप्पुरम येथील दोन लहानग्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन भावांनी आपला पॉकेटमनी मदत म्हणून दिला आहे.

10:15 May 07

'सर्व खबरदारीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करणार'

नवी दिल्ली - कोरोना संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, लवकरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळले जातील, असेही ते म्हणाले. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबत आज गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

09:11 May 07

देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा; आतापर्यंत झालेत १,७८३ मृत्यू..

नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर पोहोचली आहे. काल एका दिवसभरात झालेल्या वाढीनंतर, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ५२,९५२ वर पोहोचली आहे. यामधील ३५,९०२ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत १५,२६६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १,७८३ आहे.  

Last Updated : May 7, 2020, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.