नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्यात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९,९०० वर पोहोचली आहे.
-
PM @narendramodi will interact with state Chief Ministers on the 16th and 17th. pic.twitter.com/RWGeanxgHd
— PMO India (@PMOIndia) June 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM @narendramodi will interact with state Chief Ministers on the 16th and 17th. pic.twitter.com/RWGeanxgHd
— PMO India (@PMOIndia) June 12, 2020PM @narendramodi will interact with state Chief Ministers on the 16th and 17th. pic.twitter.com/RWGeanxgHd
— PMO India (@PMOIndia) June 12, 2020
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या (ता. १६ व १७) असे सलग दोन दिवस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला दुपारी ३ वाजता सुरूवात होईल. यात मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतील. मोदींची मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी व सातवी बैठक असेल.
-
10,667 new #COVID19 cases and 380 deaths reported in the last 24 hours. The total number of positive cases in the country now stands at 343091 including 1,53,178 active cases, 1,80,013 cured/discharged/migrated and 9,900 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/O15XwZZe7T
— ANI (@ANI) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">10,667 new #COVID19 cases and 380 deaths reported in the last 24 hours. The total number of positive cases in the country now stands at 343091 including 1,53,178 active cases, 1,80,013 cured/discharged/migrated and 9,900 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/O15XwZZe7T
— ANI (@ANI) June 16, 202010,667 new #COVID19 cases and 380 deaths reported in the last 24 hours. The total number of positive cases in the country now stands at 343091 including 1,53,178 active cases, 1,80,013 cured/discharged/migrated and 9,900 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/O15XwZZe7T
— ANI (@ANI) June 16, 2020
अनलॉक-१ घोषित केल्यानंतर मोदी पहिल्यांदाच बैठक घेणार आहेत. याआधी मोदींनी पाच वेळा बैठक घेतली आहे. १७ जूनला मोदी अन्य राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेणार आहेत. यात ते महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे.
मोदींची 'मन की बात' २८ जूनला -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. यावेळी मोदीची मन की बात हा कार्यक्रम २८ जूनला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सूचना पाठवण्यासाठी आवाहन केले आहे. या सूचना ट्विटरवरुन पाठवता येतात.
हेही वाचा - वंदे भारत मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख प्रवाशी भारतात दाखल
हेही वाचा - आत्महत्येची रिपोर्टिंग कशी असावी; आपण लोकांना आत्महत्येसाठी उद्युक्त तर करत नाही ना?