ETV Bharat / bharat

नामोल्लेख टाळत संरक्षण मंत्र्यांचा चीनला इशारा; आशियातील दोन बलाढ्य सत्तांमधील 'माईंड गेम' - राजनाथ सिंह लडाख दौरा

राजनाथ सिंह यांनी आज लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला. मात्र, ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी नाव न घेता चीनवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे सिंह यांनी चीनचे नाव घेणे टाळले.

लडाख भारत चीन सीमा
लडाख भारत चीन सीमा
author img

By

Published : Jul 17, 2020, 8:40 PM IST

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसाच्या लडाख आणि काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही भागातील नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. आज(शुक्रवार) लडाखमध्ये सीमेवर लष्करी तयारीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर सिंह श्रीनगरला रवाना झाले. लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर भारत चीनमध्ये जरी चर्चा सुरु असली तरी आशिया खंडातील दोन बलाढ्य देश एकमेकांबरोबर माईंड गेम खेळताना दिसून येत आहे.

राजनाथ सिंह यांनी आज लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला. मात्र, ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी नाव न घेता चीनवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे सिंह यांनी चीनचे नाव घेणे टाळले. लुकुंग हे ठिकाण पाँग्यांग त्सो तळ्याच्या पश्चिमेकडून असून दोन्ही सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली, तेथून 40 किमीवर आहे. तर मोदींनी लडाखमधील निमू येथील लष्करी चौकीला 3 जुलैला भेट दिली होती.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांत वाद सुरु झाल्यापासून एकदाही भारताचे नाव घेतले नाही. दोन्ही देशांमध्ये आता तणाव निवळण्यासाठी विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. याबाबत शी यांचे काय मत आहे, त्यांनी एकदाही उघड केले नाही. भारत-चीन सीमावाद सुटला पाहिजे. मात्र, किती प्रमाणात याची खात्री देऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह लडाख येथे म्हणाले.

दोन्ही देशांतील वाद सोडविण्यासाठी भारताने राजकीय आणि मुसद्देगिरीवर भर दिला आहे. भारताने आत्तापर्यंत कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. तसेच कोेणत्याही देशाची इंचभर जमीनही बळकावली नाही. आम्हाला शांतता हवी आहे. देशातील कोणतीही शक्ती भारताच्या इंचभरही जमिनीला हात लावू शकत नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी चीनचे नाव न घेता दिला. मात्र, शेवटी वाद टाळण्याकडे भारताच्या राजकिय नेतृत्त्वाचा कल आहे.

सीमेवरील कोणत्याही वादग्रस्त भागाबाबत अंतिम तोडगा निघालेला नाही. मात्र, सद्य स्थितीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या सैन्यांमधील तणाव रोखण्याकडे कल आहे. चिनी नेतृत्त्वाने खात्री दिल्याशिवाय सीमेवरील तणाव कमी होणार नाही. अजूनपर्यंत तरी चिनी नेतृत्त्वाने असा कोणताही शब्द दिला नाही.

आशिया खंडात चीनच्या वर्चस्वाला अमेरिकेकडून आव्हान दिले जात आहे. मात्र, अमेरिकेची तळी आशिया खंडातील देशांनी उचलायला नको, असा चीनचा आग्रह आहे. मात्र, दक्षिण चिनी समुद्र वाद आणि कोरोनामुळे आशियातील देशही त्रस्त आहे. चीनच्या आक्रमक धोरणाविरोधात अनेक समविचारी देश एकत्र येत आहेत. त्यामुळे चीनच्या चिंतेत आणखीनच वाढ होत आहे. आमच्या मर्जीनुसार आम्ही कोणतीही गोष्ट करु शकतो. कदाचित हे दाखविण्यासाठी चीनचा भारताबरोबर सीमावाद उकरुन काढण्यामागील हेतू असावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.