ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : अडीच महिन्यानंतर पुन्हा चर्चा; काय घडलं वाचा - भारत-चीन संघर्ष न्यूज

अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात रविवारी चर्चा झाली. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात झाली असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी नेतृत्व केले.

NAT-HN-india china corps commander meeting over ladakh border issue-pti
भारत-चीन सीमावाद : अडीच महिन्यानंतर पुन्हा चर्चा; काय घडलं वाचा
author img

By

Published : Jan 25, 2021, 9:10 AM IST

नवी दिल्ली - अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात रविवारी चर्चा झाली. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात झाली असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी नेतृत्व केले. यात एलएसी सीमारेषेवर मे महिन्यात जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती निर्माण करण्यात यावी आणि चीनी सैनिकांनी माघार घ्यावी, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मे महिन्यानंतर भारत-चीन सीमारेषेवर तणाव वाढला. यानंतर दोन्ही देशांचे ५०-५० हजार सैनिक लडाखमध्ये तैनात करण्यात आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान नववी बैठक पार पडली आहे.

भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे की, सीमारेषेवरिल सैनिकांना मागे बोलावून तणावर कमी करण्याची जबाबदारी चीनची आहे. याआधी झालेल्या ७ व्या बैठकीत चीनने पेगोंग नदीच्या दक्षिणी भागात तैनात असलेले भारतीय सैन्य हटवण्यास सांगितले होते. १२ ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या या बैठकीत, भारताने सर्व ठिकाणावरिल सैन्य परत बोलावण्याची प्रक्रिया एकावेळेस सुरूवात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

पूर्व लडाखमधील विविध ठिकाणी ५० हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, अनेकदा चर्चा होऊन देखील यावर ठोस तोडगा न निघालेला नाही. आधिकाऱ्यांचा म्हणण्यानुसार, चीनने देखील ५० हजार सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात केले आहेत.

मे महिन्यात भारत-चीन सैन्यात झडप

मे २०२० मध्ये लडाखच्या सीमेवर चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोन देशांच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला. गलवानच्या खोऱ्यात दोन्ही लष्करात हिंसक झडप झाली. यात भारताचे २० सैनिकांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर चीनच्या सैन्यांनी अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदाच या दोन देशांच्या सीमेवर गोळीबाराची घटना घडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.