नवी दिल्ली - कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तान न्यायालयाने 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यावर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली असून पाकिस्तानने हा निर्णय एफएटीएफ बैठकीच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून हाफिज सईदवर करण्यात आलेली कारवाई ही एफएटीएफच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान इतर दहशतवाद्यांवर आणि पठाणकोट हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करतो का? हे पाहणेही म्हत्त्वाचे आहे, असे भारत सरकारने म्हटले आहे.
दहशतवादी हाफिज सईद याने लाहोर आणि गुजरनवाला शहरातील दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी प्रत्येकी साडेपाच वर्ष तुरुंगवास आणि १५ हजार दंड ठोठावला आहे, असे एकूण 11 वर्षांची सजा त्याला दिली आहे. मात्र, दोन्ही सजा एकदाच लागू होत असल्याने तुरुंगवासाचा कालावधी हा साडेपाच वर्षच राहिल.
![India cautious of Pakistan court sentencing Hafiz Saeed for 11 years](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6047202-781-6047202-1581502851668_1302newsroom_1581568183_449.jpg)
मागील काही दिवसांपासून पाकिस्तान एफटीएफ पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्यात आले आहे. जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, समाधानकारक उपाययोजना न केल्यामुळे फेब्रुवारी 2019 महिन्यापर्यंत पाकिस्तान ग्रे यादीतच राहिला आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी फएटीएफने पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० पर्यंतची मुदत दिली आहे.