ETV Bharat / bharat

पाकला जशाच तसे उत्तर.. भारताकडून दिल्ली-अटारी समझोता एक्सप्रेस रद्द - दिल्ली-अटारी समझोता एक्सप्रेस रद्द

भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यावर भारतानेही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करत पाकला जशाच तसे उत्तर दिले आहे.

दिल्ली-अटारी
author img

By

Published : Aug 11, 2019, 11:58 PM IST

नवी दिल्ली - भारताकडून दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यावर भारतानेही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करत पाकला जशाच तसे उत्तर दिले आहे.

पाकिस्तानातून येणारी ही रेल्वे वाघा बॉर्डरवर पाकिस्तानने आणून सोडली होती. त्यानंतर भारताने तिकडे आपला रेल्वे चालक आणि गार्ड पाठवून रेल्वे भारताच्या हद्दीत आणली होती.

उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानने लाहोर-अटारी मार्गावर धावणारी समझोता एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावर भारताकडूनही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. ज्यांनी या अगोदरच गाडीचे बुकींग केले असेल तर त्यांना तिकीटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील. समझोता एक्सप्रेस आठवड्यामध्ये दोनवेळा वाघा बॉर्डर रेल्वेस्थानक मार्गावरून लाहोरहून अटारीला जात होती.

Intro:Body:

पाकला जशाच तसे उत्तर.. भारताकडून दिल्ली-अटारी समझोता एक्सप्रेस रद्द

नवी दिल्ली - भारताकडून दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यावर भारतानेही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करत पाकला जशाच तसे उत्तर दिले आहे.  

पाकिस्तानातून येणारी ही रेल्वे वाघा बॉर्डरवर पाकिस्तानने आणून सोडली होती. त्यानंतर भारताने तिकडे आपला रेल्वे चालक आणि गार्ड पाठवून रेल्वे भारताच्या हद्दीत आणली होती.

उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानने लाहोर-अटारी मार्गावर धावणारी समझोता एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावर भारताकडूनही दिल्ली-अटारी दरम्यान धावणारी समझोता लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहे. ज्यांनी या अगोदरच गाडीचे बुकींग केले असेल तर त्यांना तिकीटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील. समझोता एक्सप्रेस आठवड्यामध्ये दोनवेळा वाघा बॉर्डर रेल्वेस्थानक मार्गावारून लाहोरहून अटारीला जात होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.