ETV Bharat / bharat

भारताकडून लडाखमध्ये नवीन रस्ते निर्मिती, सैन्याची होणार वेगवान हालचाल

author img

By

Published : Aug 19, 2020, 5:22 PM IST

भारत मागील तीन वर्षांपासून दौलत बेग ओल्डी या भागातील पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. हा रस्ता जगातील दुर्गम अशा खारडूंगला पास भागात होत आहे. येथील पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यानंतर भारताला आपल्या सैन्य दलाची हालचाल वेगाने करता येणार आहे.

India building new road to Ladakh, for facilitating troop movement without observation from enemy

नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानने लडाख सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने मनाली ते लेह या नव्या तिसऱ्या लिंक रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्यामुळे लडाख आणि देशातील इतर भागास जोडणार आहे.

भारत मागील तीन वर्षांपासून दौलत बेग ओल्डी या भागातील पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. हा रस्ता जगातील दुर्गम अशा खारडूंगला पास भागात होत आहे. येथील पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यानंतर भारताला आपल्या सैन्य दलाची हालचाल वेगाने करता येणार आहे.

चीनी सैन्याने घुसखोरी केली -

चीनी सैन्याने मे महिन्यात पूर्व लडाखच्या काही भागामध्ये घुसखोरी केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. ५ मेपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि गलवान व्हॅलीच्या प्रदेशात चीनच्या हालचाली वाढल्या होत्या. १७ व १८ मेला कुगरांग नाला, गोग्रा आणि उत्तर पँगाँग लेकच्या प्रदेशात चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.