ETV Bharat / bharat

बैरुत ब्लास्ट : भारताने लेबनॉनला पाठवली मदत..

author img

By

Published : Aug 14, 2020, 5:06 PM IST

लेबनॉनमध्ये झालेल्या दुर्देवी स्फोटांनंतर, तेथील नागरिकांच्या पाठिशी भारत उभा आहे. ५८ मेट्रिक टन आपत्कालीन मानवतावादी मदत, ज्यामध्ये अत्यावश्यक औषधे आणि अन्नाचा समावेश आहे हे आयएएफ सी१७ या विमानाने बैरुतला पोहोचत आहे. अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी शुक्रवारी केले.

India airlifts relief aid to explosion-hit Beirut
बैरुत ब्लास्ट : भारताने लेबनॉनला पाठवली मदत..

नवी दिल्ली : लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये दहा दिवसांपूर्वी दोन भीषण स्फोट झाले होते. त्यानंतर मदत म्हणून भारताने औषधे, अन्नाची पाकिटे आणि इतर अत्यावश्यक वस्तू बैरुतला पाठवल्या आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली.

लेबनॉनमध्ये झालेल्या दुर्देवी स्फोटांनंतर, तेथील नागरिकांच्या पाठिशी भारत उभा आहे. ५८ मेट्रिक टन आपत्कालीन मानवतावादी मदत, ज्यामध्ये अत्यावश्यक औषधे आणि अन्नाचा समावेश आहे हे आयएएफ सी१७ या विमानाने बैरुतला पोहोचत आहे. अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी शुक्रवारी केले.

  • India demonstrates solidarity with the people of Lebanon in the aftermath of the tragic explosions in Beirut. 58 MT of emergency humanitarian aid, including crucial medical and food supplies, is on its way to Beirut in IAF C17 aircraft. pic.twitter.com/JIfvdrvSYc

    — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चार ऑगस्टला बैरुतमध्ये दोन भीषण स्फोट झाले. यात तब्बल १६० जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ६ हजार लोक जखमी झाले. शहरातील घरांच्या आणि इमारतींच्या नुकसानामुळे सुमारे ३ लाख लोक बेघर झाले. यानंतर जनतेने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, परिणामी तेथील सरकारने राजीनामा दिला होता.

भारताचे पूर्वीपासूनच लेबनॉनशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्या लेबनॉनमध्ये ९ हजारांहून अधिक भारतीय आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.