संयुक्त राष्ट्र- जगभरात गेल्या 50 वर्षात 14 कोटी 26 लाख महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी 4 कोटी 58 लाख महिला भारतातील आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने मंगळवारी एका अहवाल सादर केला. यात बेपत्ता महिलांची संख्या चीन आणि भारतात सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) मंगळवारी जाहीर केलेल्या 'ग्लोबल पॉप्युलेशन स्टेटस 2020' च्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या 50 वर्षांत बेपत्ता महिलांची संख्या दुपटीने वाढली आहे. ही संख्या 1970 मध्ये 10 लाख होती. 2020 मध्ये ती वाढून 4 कोटी 58 झाली आहे. तर चीनमध्ये 23 लाख महिला बेपत्ता आहेत.
बेपत्ता महिला | वार्षिक महिला मृत्यू दर | 2020 मध्ये जन्मल्यानंतर बेपत्ता मुली |
जगभरात- 14.26 कोटी | जगभरात 17.1 लाख | जगभरात- 15 लाख |
भारतात- 4.58 कोटी | भारतात- 3.60 लाख | भारतात- 5.90 लाख |
हेही वाचा- कानपूर चकमक प्रकरण: तीन आरोपी अटकेत
2013 ते 2017 दरम्यान दरवर्षी भारतात सुमारे चार लाख 60 हजार मुली जन्मानंतर बेपत्ता झाल्या आहेत. तज्ञांच्या मते लिंगभेदामुळे जगभरात अंदाजे 12 लाख ते 15 लाख मुली बेपत्ता होतात. यात 90 ते 95 टक्के मुली या भारत आणि चीनमधील असतात. दरवर्षी मुली जन्माच्या संखेतही दोन्ही देश आघाडीवर आहेत. चीन आणि भारतात जन्मलेल्या बाळांपैकी पहिल्यांदा 1980 च्या दशकात लैंगिक असमतोल दिसून आला होता.
हेही वाचा- #HappyBirthdayDhoni, धोनीचे काही अविस्मरणीय सामने
भारतात संभावित वरांपैकी संभावित वधुंचे प्रमाण 2055 मध्ये मोठ्या प्रमाणात घटलेले असेल. त्यामुळे वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत अविवाहित राहणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 2050 नंतर 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे अहवालात वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा- 'नरेंद्र मोदींचे सरकार आरक्षण विरोधी..तर, हिंदू असूनही ओबीसींवर अन्याय'