इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येत्या २१ तारखेपासून तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेतील महागड्या हॉटेलच्या भाड्याचे पैसे वाचवण्साठी आणि दौऱ्याचा खर्च कमी करण्यासाठी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदुताच्या घरी राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी राजदूत असद माजिद खान हे वॉशिंग्टनच्या मध्यवर्ती परिसरात असणाऱ्या राजनयिक वसाहतीमध्ये राहतात. या परिसरात भारत, तुर्की, जपान यासह अनेक देशांचे दूतावास आहेत. हॉटेलऐवजी असद माजीद खान या राजदुताच्या निवासस्थानी राहणे ही एक अर्थव्यवस्था सावरण्यासाठीची उपायोजना आहे.
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे जागतिक आर्थिक संस्थांकडून मदत मिळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत.