ETV Bharat / bharat

कोरोनाला घाबरू नका : घरच्या घरीच तयार करा 'रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पेय'

लॉकडाऊनमुळे सध्या लोक आपल्या घरातच आहेत. घरात असल्याने त्यांना आपल्या आरोग्याची चांगल्याप्रकारे काळजी घेता येत नाही. अशा वेळी आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण बर्‍याच घरगुती उपायांचा देखील वापर करुन आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:29 AM IST

Drinks that enhance immunityो
रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पेय

भोपाळ - कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच आपला सगळा वेळ घालवत आहेत. यावेळी, काही लोक घरातच काम करत असल्याने दिवसभर खुर्चीवर बसून राहतात. अशावेळी आपल्याला स्वतःच्या तब्येतीची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण घरात सतत मुक्काम केल्यामुळे आपली शारिरीक कृती थांबलेली असते. आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण बर्‍याच घरगुती उपायांचा देखील वापर करुन आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. अध्यात्म जगाशी संबंधित आचार्य प्रतिष्ठान यांनी अशाच एका प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेय विषयी माहिती दिली.

घरच्या घरीच तयार करा 'रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पेय'...

हेही वाचा... गंभीर! मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर

असे बनवा रोग प्रतिकारकशक्ती वाढवणारे पेय...

हे पेय तयार करण्यासाठी, गुळवेल, आले, तुळस आणि लिंबू आवश्यक आहेत. आले आणि गुळवेल यांचा प्रथम कुट करुन त्यांना एकत्र करायचं. त्यानंतर त्यात पाणी टाकायचे. यानंतर त्यात तुळस टाकावी. जेव्हा हे एकूण मिश्रण गरम होईल तेव्हा त्यात लिंबू घालून ते प्यावे. यामध्ये आपण गरजेनुसार साखर देखील घालू शकतो. आचार्य प्रतिष्ठान यांनी सांगितले की हे पेय आपण घरात बसुन सहज बनवू शकतो.ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.