नवी दिल्ली - जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूसारख्या प्राणघातक रोगावर औषधे शोधत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीचे संशोधकही या प्राणघातक विषाणूवर औषध शोधण्याचे काम करत आहेत. यासाठी संस्था या संशोधकांना सुपर कॉम्प्युटर देखील वापरण्याची सुविधा देत आहे. या सुपर कॉम्प्युटरचा वापर आयआयटी दिल्लीचे संशोधक अनेक औषधांच्या शोधात आणि संशोधनात करत असतात.
हेही वाचा... #coronavirus : पिंपरी-चिंचवडमधील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा २१
कोविड-19 वर दोन संशोधन सुरु...
या संपूर्ण प्रकरणाबद्दल आयआयटीचे संचालक प्रो. व्ही. राम गोपाल राव यांनी सांगितले की, सध्या आयआयटी दिल्लीत कोविड-19 वर आधारित दोन संशोधन कामे सुरू आहेत. त्यापैकी कुसुम स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स आणि रसायनशास्त्र विभागाचे संशोधक कोरोना विषाणूची औषधे बनविण्यात व्यस्त आहेत. ते अशा कणांवर संशोधन करीत आहेत जे विषाणूंविरूद्ध वेगवेगळ्या टप्प्यांत संघर्ष करतील आणि त्याचा प्रसार रोखू शकतील.
व्हेंटिलेटरच्या बाबतीत देखील सुरु आहे संशोधन...
तसेच येथे दुसरे संशोधन हे केमिकल अभियांत्रिकी विभाग व ऊर्जा अभ्यास केंद्रातील संशोधक करत आहेत. ते असे व्हेंटिलेटर तयार करण्याचे काम करत आहेत, ज्यामध्ये एका व्हेंटिलेटरवर अधिक रुग्णांना सुविधा देता येईल.
हेही वाचा... Good News : एका व्हेंटिलेटरमधून 8 रुग्णांना मिळणार प्राणवायू, नागपूरमधील डॉक्टरांची किमया
सध्याच्या संशोधनाची 15 एप्रिल पर्यंत मिळणार माहिती...
सध्या कोरोना विषाणूवर संशोधन करत असणारे कोणताही व्यक्ती 15 एप्रिल पर्यंत संस्थांसोबत संपर्क करु शकतो. त्यांना या सुपर कंप्यूटर वापरण्यासाठी परवानगी मिळू शकते. तसेच कोणत्याही माहितीसाठी, संस्थेच्या covid19@hpc.iitd.ac.in या ईमेल आयडी वर संपर्क साधू शकतात.