पाटणा - बिहार निवडणुकीचं रणशिंग फुंकले असून सत्ता स्थापनेसाठी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. आज काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. बिहार निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेत आलो. तर आमचे सरकार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात विधेयक मंजूर करेल, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांसोबत महागंठबंधन केले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेवर आलो. तर सरकार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात विधेयक मंजूर करेल, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह म्हणाले.
संपूर्ण बाजारपेठ पद्धतीच नष्ट केल्या तर, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत कशी देता येणार, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार यांनी सांगावे, असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी केला. तसेच महागठबंधन सरकारने आज संयुक्त जाहीरनामा जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.