नवी दिल्ली - पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजप-आरएसएसच्या नेत्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'अखंड जम्मू-काश्मीर भारताचा भाग असून तो पाकिस्ताने अवैधरीत्या गिळंकृत केला आहे. पाकिस्तान आणि इम्रान खान यांना स्वतःच्या हिताची चिंता असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,' असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
'पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पाकिस्तान सरकारवर नाराज असून त्यांची पाकिस्तानसोबत राहण्याची इच्छा नाही. त्यांची भारतात येण्याची इच्छा आहे. याबाबत वारंवार माहिती मिळत आहे. ७० वर्षांपासून पाकिस्तानने भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरच्या एक तृतीयांश (1/3) प्रदेशावर अवैधरीत्या कब्जा केला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे,' असे आठवले म्हणाले.
'पाकिस्तानला त्यांच्या भल्याची चिंता असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवावा. इम्रान खान यांना खरोखरच पाकिस्तानच्या हिताची चिंता असेल आणि त्यांना युद्ध नको असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणेच त्यांच्यासाठी चांगले ठरेल,' असा सज्जड इशारा आठवले यांनी दिला.
-
Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: Reports are coming in that people in PoK don't want to be with Pakistan & want to join India. Since 70 years Pakistan has had 1/3rd of our Kashmir captured. It is a serious matter. (13.09.2019) https://t.co/VHhwGR6RZ0
— ANI (@ANI) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: Reports are coming in that people in PoK don't want to be with Pakistan & want to join India. Since 70 years Pakistan has had 1/3rd of our Kashmir captured. It is a serious matter. (13.09.2019) https://t.co/VHhwGR6RZ0
— ANI (@ANI) September 14, 2019Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: Reports are coming in that people in PoK don't want to be with Pakistan & want to join India. Since 70 years Pakistan has had 1/3rd of our Kashmir captured. It is a serious matter. (13.09.2019) https://t.co/VHhwGR6RZ0
— ANI (@ANI) September 14, 2019
हेही वाचा - येत्या काळात पाकिस्तानचे आणखी ५-६ तुकडे होतील - आरएसएस नेते
५ ऑगस्टला भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संमतीने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. या निर्णयानंतर बिथरलेल्या पाकिस्तानचा जगभरातून आपल्या बाजूने जनमत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. उलट, फ्रान्सच्या आमंत्रणावरून जी-७ परिषदेला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरविषयीचा निर्णय भारताची अंतर्गत बाब असल्याचे स्पष्टपणे सांगितले आणि भारतासाठी इतर देशांचा पाठिंबाही मिळवला. या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी हीच भूमिका मांडली. तसेच, जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानही फाळणीपूर्वी भारताचाच भाग होता, असेही मोदी म्हणाले होते. यानंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतल्यानंतरही पाकिस्तानची डाळ शिजली नाही. आता भारतीय नेत्यांकडून पाकिस्तानवर हल्ला चढवण्यात येत आहे.
हेही वाचा - संविधानाच्या मूळ प्रतीत राम, कृष्ण आणि भगवद् गीतेचा उल्लेख - रविशंकर प्रसाद