ETV Bharat / bharat

बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट : 'नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर बिहार उद्ध्वस्त होईल'

author img

By

Published : Oct 21, 2020, 3:37 PM IST

लोजपा प्रमुख चिराग पासवान यांनी पक्षाचा जाहिरनामा जारी केला. 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' असे जाहीरनाम्याचे नाव आहे. तसेच यावेळी चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'चुकीनेही नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर, बिहार उद्ध्वस्त होईल', अशी टीका त्यांनी केली.

चिराग
चिराग

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडत लोकजन शक्ती पार्टी (लोजपा) स्वबळावर निवडणूक लढत आहे. आज लोजपाप्रमुख चिराग पासवान यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला. 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' असे जाहिरनाम्याचे नाव आहे. दिवंगत रामविलास पासवान यांनी 51 वर्षांच्या राजकीय अनुभवावरून जाहीरनामा तयार केला आहे, असे चिराग पासवान म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'चुकीनेही नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर, बिहार उद्ध्वस्त होईल', अशी टीका त्यांनी केली.

रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी चिराग पासवान यांच्यावर येऊन पडली आहे. विरोधी पक्षांचा पराभव करत विजय मिळवण्यासाठी चिराग पासवान जोरदार प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी पुन्हा नितिश कुमार यांच्यावर निशाणा साधला. विद्यामान मुख्यमंत्री नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर उभे राहील. नितिश कुमार जातीयवादाला चालना देतात. त्यांच्या नेतृत्वात बिहारच्या विकासाची कल्पना करणे करणे योग्य ठरणार नाही, असे चिराग पासवान म्हणाले.

सत्तेत आल्यांतर मंजूर झालेल्या सर्व विभागांची पदे लवकरच भरली जातील. करारावर राज्य सरकारमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी नियमित केले जातील. पूर आणि दुष्काळ रोखण्यासाठी राज्यातील सर्व नद्या कालव्याद्वारे जोडल्या जातील, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

243 जागांच्या बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर या तीन टप्प्यांत होईल आणि मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.