ETV Bharat / bharat

'सत्य बोलल्यामुळे तुरुंगात मृत्यू आला तरी चालेल, लढा शेवटपर्यंत लढणार' - मुनव्वर राणा बातमी

फ्रान्समधील हत्येप्रकरणी राणा यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. पोलीस दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुनव्वर यांच्या वक्तव्याने सामाजिक सौहार्द बिघडले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.

मुनव्वर राणा
मुनव्वर राणा
author img

By

Published : Nov 2, 2020, 7:40 PM IST

नवी दिल्ली - 'माझ्याविरोधातील खटला मी शेवटपर्यंत लढेन, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांनी दिली आहे. जो कोणी सत्य बोलतो त्याला अपमानजनक बोलला म्हणून शिक्षा होते. अनेकांना याचा सामना करावा लागलेला आहे. इतकेच काय खरे बोलले म्हणून महात्मा गांधींची सुद्धा या देशात हत्या झाली होती. मी सर्वकाही सहन करायला तयार आहे. सत्य बोलल्यामुळे तुरुगांत राहून माझ्या मृत्यू झाला तरी चालेल मात्र मी सत्याची कास सोडणार नाही, अशा शब्दांत राणा यांनी स्पष्टिकरण दिले आहे. फ्रान्समधील हत्येप्रकरणी राणा यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुनव्वर राणा

मुनव्वर यांच्याविरोधात गुन्हा -

प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे गुन्हा दाखल झाला आहे. फ्रान्समधील हत्येप्रकरणी राणा यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. पोलीस दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुनव्वर यांच्या वक्तव्याने सामाजिक सौहार्द बिघडले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.

काय म्हणाले होते मुनव्वर राणा?

व्यंगचित्र हे प्रेषित मोहंमद आणि इस्लामचा अवमान करणारे होते. फ्रान्समधील लोकांची प्रतिक्रिया साहजिक होती. मी त्याठिकाणी असतो तर कदाचित मीसुद्धा तसाच वागलो असतो, असेही राणा म्हणाले. मी सदर प्रकरणात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही राणा यांनी सांगितले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद -

फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅक्रान यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.