नवी दिल्ली - भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) आज कोरोना महामारीविरोधात आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे. 'नोव्हेल आयडियाज इन सायन्स अॅण्ड एथिक्स ऑफ व्हॅक्सिन अगेंस्ट कोविड-१९' या विषयावर परिसंवादामध्ये चर्चा होईल.
या परिसंवादामध्ये प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ आणि वक्ते म्हणून शास्त्रज्ञ असतील. हा कार्यक्रम 4:30 ते 6:45 वाजण्याच्या दरम्यान आयोजित केला जाईल. या परिसंवादामध्ये राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्था संचालक डॉ अँथनी संबोधित करणार आहेत.
दरम्यान, देशात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 48 हजार 513 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 15 लाख 31 हजार 669 वर पोहोचली आहे. तर, 768 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 34 हजार 193 नागरिकांचा कोरोनांमुळे मृत्यू झाले आहे.