नवी दिल्ली - आय मॉनेटरी अॅडव्हायजरी’ (आयएमए) ह्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान भारतात येण्यास तयार झाला आहे. येत्या 24 तासाच्या आत भारतात परतणार असल्याचे त्याने एक व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
-
Mansoor Khan, Main accused in IMA Ponzi Scam Case: God willing,I will return to India in the next 24 hours, I have full faith in Indian judiciary. First of all, leaving India was a big mistake, but circumstances were such that I had to leave. I don't even know where my family is. pic.twitter.com/jMAowWA2oO
— ANI (@ANI) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mansoor Khan, Main accused in IMA Ponzi Scam Case: God willing,I will return to India in the next 24 hours, I have full faith in Indian judiciary. First of all, leaving India was a big mistake, but circumstances were such that I had to leave. I don't even know where my family is. pic.twitter.com/jMAowWA2oO
— ANI (@ANI) July 15, 2019Mansoor Khan, Main accused in IMA Ponzi Scam Case: God willing,I will return to India in the next 24 hours, I have full faith in Indian judiciary. First of all, leaving India was a big mistake, but circumstances were such that I had to leave. I don't even know where my family is. pic.twitter.com/jMAowWA2oO
— ANI (@ANI) July 15, 2019
'मी देश सोडून मोठी चूक केली. मात्र त्यावेळची परिस्थिती तशी होती की देश सोडून जाव लागलं. मी येत्या 24 तासाच्या आत भारतात परतणार आहे. भारतातील न्यायालयीन व्यवस्थेवर माझा पुर्ण विश्वास आहे. देश सोडल्यानंतर मला माहित नाही की माझे कुटुंब कोठे राहते. त्यांनी कशा प्रकरे जीवन व्यतीत केले असेल', असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
देशातील २३ हजारांहून जास्त लोकांची फसवणूक करुन मोहम्मदने भारतातून पळ काढला होता. बंगळुरुमध्ये मोठे रिटर्न्स मिळवून देतो असे सांगत त्याने हजारो लोकांना गंडा घातला होता. बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. मात्र त्यापुर्वी त्याने भारत सोडून पळ काढला.